ओबीसी बहुजन पार्टीतर्फे निवडी

ओबीसी बहुजन पार्टीतर्फे निवडी

Published on

ओबीसी बहुजन पार्टी
जिल्हाध्यक्षपदी कुंभार
कोल्हापूर : ओबीसी बहुजन पार्टीची जिल्हा कार्यकारिणी करण्यासाठी मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग येथे सभा झाली. यामध्ये जिल्हाध्यक्षपदी एकनाथ कुंभार तर तीन तालुक्यांमधून एक जिल्हा उपाध्यक्षपदावर बाळासाहेब लोहार, सचिन सुतार यांची निवड झाली.
राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिगंबर लोहार म्हणाले, ‘‘राजकीय सत्ता कायदेमंडळ सत्ता वाटपाचे केंद्र असल्याने या केंद्रात ओबीसी, भटके विमुक्त, मागासवर्गीय समाजाचे खरे प्रतिनिधित्व पोहचवण्यासाठी ओबीसी बहुजन पार्टी कार्यरत असेल.’’ सयाजी झुंजार म्हणाले, ‘‘ओबीसींच्या संवैधानिक न्याय्य हक्क संरक्षणासाठी राजकारणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे राजकारणात ओबीसींचा सक्रिय सहभाग असलाच पाहिजे.’’ एम. के. सुतार, पांडुरंग परीट, धनाजी गुरव, बाळासाहेब मोमीन, काशिनाथ माळी, सरपंच जालिंदर कुंभार यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीत ज्योतिराम लोहार, नामदेव सुतार, चंद्रकांत कोवळे, ज्ञानेश्वर सुतार, योगेश कुंभार, डी. बी. सातार्डेकर, आकाश सुतार, बाळासाहेब लोहार, किशोर लिमकर, बळीराम गुरव, तानाजी मर्दाने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.