निधन वृत्त

निधन वृत्त

Published on

gad33.jpg

94582
अलका भोईटे
गडहिंग्लज : येथील वडरगे मार्गावरील अलका प्रकाश भोईटे (वय ६५) यांचे निधन झाले. त्या जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा व केंद्रीय कार्यकारणी समितीच्या सदस्या होत्या. काही वर्षे त्यांनी जिल्हाध्यक्षपदही सांभाळले होते. अंधश्रद्धा निर्मूलन, दारुबंदी चळवळ, जटानिर्मूलनासह विविध सामाजिक चळवळीत त्या अग्रेसर होत्या. त्यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी कोणत्याही प्रकारचा धार्मिक विधी करण्यात आला नाही. शुक्रवारी (ता.५) सकाळी नऊला रक्षाविसर्जन आहे. तेही झाडांना रक्षा घालून पर्यावरणपूरक पद्धतीने केले जाणार आहे. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, सून असा परिवार आहे.


GAD36.JPG

संभाजीराव शिंदे
नूल ः हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य व गोडसाखरचे माजी संचालक संभाजीराव ऊर्फ बाळासाहेब गोपाळराव शिंदे (वय ७४) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ४) आहे.

04623
शांताबाई मोरे-भाट
कसबा वाळवे : चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील शांताबाई रघुनाथ मोरे-भाट (वय ९१) यांचे निधन झाले. त्या कोल्हापूर जिल्हा भाट समाज सदस्य उमेश रघुनाथ मोरे यांच्या मातोश्री होत. त्यांच्यामागे चार मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.