खूनातील आणखीन दोघा संशयितांना अटक

खूनातील आणखीन दोघा संशयितांना अटक

Published on

94691 उमेश काटे
94692 अमित गायकवाड
...

खुनातील चौघा संशयितांना सात दिवस कोठडी
चारही मारेकरी पकडले : तीन दगड जप्त
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : पूर्ववैमनस्यातून राजारामपुरीत झालेल्या पंकज निवास भोसले (वय ३३, रा. कनाननगर) याच्या खूनप्रकरणी चारही संशयितांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. नीलेश उर्फ किशोर विक्रम काटे (वय २७) व गणेश विक्रम काटे (वय ३०) या दोघांना घटनास्थळीच पाठलाग करून पकडण्यात आले होते. तर अमित उल्हास गायकवाड (वय ३०) व उमेश विक्रम काटे (सर्व रा. कनाननगर) यांना रात्री उशिरा गडमुडशिंगी येथून ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सांगितले.
काटे कुटुंबातील तीनही भावांचा पंकज भोसलेसोबत यापूर्वी वाद झाला होता. याचा राग मनात धरून दोन्ही कुटुंबे एकमेकांसमोर आल्याने भांडणाचे प्रकार घडत होते. पंकज आपल्याला केव्हा तरी मारणार या भीतीपोटी काटे कुटुंबातील तिघा सख्ख्या भावांनी पंकज भोसलेला संपवायचे, असे ठरवून कट रचल्याचे पोलिस चौकशीत पुढे येत आहे. मंगळवारी राजारामपुरी १३ व्या गल्लीत पंकज चालक म्हणून कामाला असलेल्या ठिकाणी गाठून चौघांनी त्याच्‍यावर हल्ला केला.
तीन दगड पंकजच्या डोक्यात घातल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नीलेश व गणेशला घटनास्थळापासून काही अंतरावर पकडले. तर मध्यरात्री अमित गायकवाड व उमेशला गडमुडशिंगीतून ताब्यात घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.