पाच लाखांच्या रकमेपोटी उकळले १६ लाख, तीन महिला सावकारांवर गुन्हा दाखल
Kolhapur Crime:sakal

Kolhapur Crime: पाच लाखांच्या रकमेपोटी उकळले १६ लाख, तीन महिला सावकारांवर गुन्हा दाखल

Published on




कोल्हापूर, ता. ३ ः चिकन ६५ चा गाडा चालविणाऱ्या महिलेला हातउसणे म्हणून वेळोवेळी दिलेल्या पाच लाख तीन हजारांच्या रकमेपोटी तब्बल १६ लाख ५५ हजार रुपये उकळणाऱ्या तीन महिला सावकारांसह चौघांविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

संगीता सुनील फडतारे (रा. जुना वाशीनाका), कमल नलवडे (रा. शहाजी वसाहत), सुवर्णा जाधव (शिंगणापूर) व सूरज गर्जे (रा. इचलकरंजी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत आयेशा अन्सार बागवान (वय ३७, रा. जुना वाशीनाका) यांनी फिर्याद दिली.

आयेशा बागवान या रंकाळा तलावासमोरील राजकपूर पुतळा परिसरात चिकन ६५ चा गाडा चालवतात. घरगुती अडचणी व व्यवसायासाठी त्यांनी चौघा सावकारांकडून वेळोवेळी रक्कम घेतील होती. याची व्याजासहीत परतफेड करूनची तीन महिला सावकारांसह चौघांकडून त्यांच्याकडे तगादा सुरू होता.

पाच लाख तीन हजारांच्या रकमेपोटी १६ लाख ५५ हजार रुपये भागवूनही सावकारांकडून तगादा सुरू होती. यातून फिर्यादीच्या पतीला शिवागाळ करून जून २०२३ मध्ये चिकन ६५ च्या दोन गाड्याही काढून घेण्याचा प्रकार झाला होता. अखेर या त्रासाला कंटाळून त्यांनी आज जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.