गुप्तधनाच्या  अमिषाने अघाेरी कृत्य करणाऱ्यांना अटक दाेन फाेटाे

गुप्तधनाच्या अमिषाने अघाेरी कृत्य करणाऱ्यांना अटक दाेन फाेटाे

Published on

गुप्तधनासाठी घरात खड्डा खोदून विधी
कौलवमध्ये प्रकार; घरमालकासह सहाजणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शाहूनगर, ता. ३ ः राधानगरी तालुक्यातील कौलव येथे गुप्तधन मिळवण्याचे आमिष दाखवून एका घरामध्ये खड्डा खणून अघोरी धार्मिक विधी करणाऱ्या घरमालक, मांत्रिक व इतर चौघांना राधानगरी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अटक केली आहे. नरबळी, अनिष्ट-अघोरी प्रथा व जादुटोणाविरोधी कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालक शरद धर्मा माने (रा. कौलव), मांत्रिक महेश सदाशिव काशिद (राजमाची, ता. कऱ्हाड), अशिष रमेश चव्हाण, चंद्रकांत महादेव धुमाळ (दोघे रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) आणि संतोष निवृत्ती लोहार (वाझोली, ता. पाटण), कृष्णात बापू पाटील (पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद माजी उपसरपंच अजित पाटील यांनी दिली. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत राधानगरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः कौलव येथे मुख्य रस्त्याशेजारी असणाऱ्या शरद माने यांच्या घरामध्ये गुप्तधन मिळवण्याच्या उद्देशाने गेले आठ दिवस काही प्रकार व धार्मिक विधी सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात ग्रामस्थांमध्ये होती. मंगळवारी रात्री या घरामध्ये अघोरी धार्मिक विधी व जादुटोणा करणाऱ्या पाच व्यक्ती आल्याचे ग्रामस्थांना समजले. ग्रामस्थांनी ही गोष्ट सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या निदर्शनास आणून दिली. कुंभार यांनी सतर्कता दाखवत त्या घरामध्ये जाऊन माहिती घेतली. त्यावेळी तेथे देवघरात चार ते पाच फुटाचा खड्डा खोदल्याचे दिसले. तेथे मांत्रिक महेश काशीदसह चौघांकडून केळीच्या पानावर हळद-कुंकू, टाचण्या मारलेले लिंबू, नारळ, सुपारी, केळी ठेवून मंत्रोच्चारात अघोरी विधी सुरू असल्याचे निदर्शनास आले. याबाबत सरपंचांनी घरमालक माने यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सरपंचांनी ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्षांना बोलावून राधानगरी पोलिसांना याची माहिती दिली.
राधानगरीचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे तत्काळ सहकाऱ्यांसह गावात दाखल झाले. त्यांनी संबंधित घराची पाहणी केली. घरातील खड्डा, शेजारी असणारे लिंबू व इतर संशयास्पद वस्तू यावरून गुप्तधनाच्या लालसेने हा प्रकार केल्याच्या संशय बळावला. त्यांनी घरमालक मानेसह इतर पाचजणांना ताब्यात घेतले. मंगळवारी मध्यरात्री त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
त्यांच्याकडे चौकशी केली असता, मानेला गुप्तधन मिळवून देण्यासाठी खड्डा खोदल्याचे व विधी केल्याचे अन्य चौघांनी पोलिसांना सांगितले. पाचही जणांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्या सर्वांना एक दिवसाची कोठडी देण्यात आली. निरीक्षक गोरे तपास करीत आहेत.
दरम्यान, हा प्रकार उघडकीस आणण्यासाठी सरपंच कुंभार यांच्यासह माजी उपसरपंच अजित पाटील, संदीप चरापले, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वास पाटील, संभाजी पाटील, शहाजी पाटील, उदय पाटील व सदस्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.

चौकट
सतर्क ग्रामस्थांसह सदस्यांमुळे प्रकार उघड
ग्रामस्थांकडून प्रकार समजताच सरपंच रामचंद्र कुंभार यांनी तत्परतेने घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना कळविल्यामुळेच अघोरी कृत्य उघडकीस आले. याची माहिती गावामध्ये समजताच मंगळवारी रात्री मानेच्या घरासमोर ग्रामस्थांनी गर्दी करत तीव्र संताप व्यक्त केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी पुरोगामी महाराष्ट्राला कलंक लावणारा हा प्रकार असून, अघोरी प्रकार नरबळी देण्याच्या हेतूने झाला आहे का, याची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

03888 व 03887
कौलव (ता. राधानगरी) : गुप्तधनासाठी येथील शरद माने याच्या घरात खोदलेला खड्डा. त्यासंदर्भातील विधीसाठी वापरलेले साहित्य.
04634 - शरद माने
4633 - चंद्रकांत धुमाळ
04632 - आशिष चव्हाण
04630- अरविंद लोहार
04629 - महेश काशीद
B04628- कृष्णात पाटील
०००००००००००००००००००००००००००००००००००००००


फोटो ओळी : कौलव : गुप्तधन मिळविण्याच्या उद्देशाने येथील शरद माने याच्या घरात खोदलेला खड्डा व धार्मिक विधीसाठी वापरलेले साहित्य.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.