जाहिरात- आयकॉन स्टील

जाहिरात- आयकॉन स्टील

94841
कोल्हापूर : येथे अभियंत्यांसाठी आयोजित बैठकीत बोलताना अखिलेश राठी.

‘आयकॉन स्टील’ कोल्हापूरसारखेच
ताकदवान : अखिलेश राठी
अभियंत्यांची बैठक; तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
कोल्हापूर, ता. ४ : प्राचीन इतिहास आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतिबिंब असलेल्या कोल्हापुरात वास्तुकलेचे विविध नमुने बघायला मिळतात. त्यावेळच्या अभियंत्यांनी ही किमया घडवून आणली आहे. त्यांचीच परंपरा येथील अभियंते नेटाने पुढे नेत आहेत. त्यांच्या नवसंकल्पनामुळे शहराला नवा साज चढवला जातो आहे. त्यामध्ये आयकॉन स्टीलचाही सहभाग असून ‘आयकॉन स्टील’ कोल्हापूरसारखेच ताकदवान असल्याचे मत आयकॉन स्टीलचे संचालक अखिलेश राठी यांनी व्यक्त केले. कोल्हापूर आणि परिसरातील अभियंत्यांसाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
गुणवत्तापूर्ण सळईमुळे दर्जेदार बांधकाम उभारली जाऊ शकतात. त्यामुळे गुणवत्तापूर्ण स्टीलचा कोल्हापूरकरांनी सर्वात आधी विचार करावा, असे आवाहनही यावेळी राठी यांनी केले. सळईला अधिक मजबूत, टिकाऊ बनविणाऱ्या विविध घटकांची माहिती यावेळी आयकॉन स्टीलचे क्वॉलिटी हेड राजेंद्र त्रिपाठी यांनी दिली. बांधकामाच्या वेळी येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यातून मार्ग काढण्याच्या उपाययोजनांविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
‘क्रेडाई’चे माजी व्यवस्थापक पवन जमादार, पेठवडगाव इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत नेरलेकर, उपाध्यक्ष प्रदीप निकम, दयानंद सोनार, दीपक कचरे, अमित नायकोजी, आर्किटेक्ट संजय ग्यानी, प्रसन्न शिंदे, राघव दाड, हरिप्रिया सेल्सचे संजय चव्हाण, महेंद्र इस्पातचे धीरज ओसवाल, महेंद्र ओसवाल, पार्वती इंटरप्रायजेसचे शाहू जाधव, मनीष स्टीलचे प्रकाश ओसवाल, पट्टणकोडोली येथील महालक्ष्मी स्टीलचे जब्बरभाई पुरोहित, चंदवाणी स्टीलचे जय चंदवाणी, पेठवडगावच्या माणकेश्‍वर ट्रेडर्सचे सुजय माळी, करवीर ट्रेडर्सचे त्रिलोक देवासी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com