विद्यार्थ्यांनी तयार केली रोप कलमे

विद्यार्थ्यांनी तयार केली रोप कलमे

विद्यार्थ्यांनी तयार
केली रोप कलमे
गडहिंग्लज : भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील केंद्र शाळेतील सहावी व सातवीच्या ७० विद्यार्थ्यांनी रोप कलमे तयार केली. उपक्रमासाठी कृषी सहायक अनिल कांबळे यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकातून कृतियुक्त मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत आंबा, पिंपळ, करंज, जास्वंद, आदी देशी रोपांची ७५ कलमे तयार केली. विज्ञान शिक्षिका पद्मश्री गुरव यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते. मुख्याध्यापक बाळासाहेब शेरेकर, आदींचे सहकार्य मिळाले.
--------------------------------------------
हलकर्णीत
डॉक्टरांचा गौरव
नूल : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर्स डे उत्साहात झाला. यावेळी डॉक्टरांचा गौरव केला. आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व इतर कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा धबाले यांचा सत्कार केला. समुदाय आरोग्य अधिकारी स्नेहा धबाले, आरोग्य सेविका रिया साळुंखे, अर्चना शिंदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ सरिता खोत, माया कुंभार, के. जी. चौगुले, प्रियंका पाटील, ए. बी. पाटील, विणा पाटोळे, अश्विनी हसुरकर, संगीता नाईक, आदी उपस्थित होते.
-----------------------------------------------------
शिवसेनेतर्फे
आनंदोत्सव
गडहिंग्लज : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर निवडणुकीत मतदारसंघातून शिवसेनेचे (ठाकरे गट) अनिल परब व मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांचा विजय झाल्याबद्दल येथील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी व साखर पेढे वाटले. जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी भविष्यातील सर्व निवडणुकीत शिवसेनेला (ठाकरे गट) यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे आवाहन केले. संभाजी पाटील, दिलीप माने, अजित खोत, अवधूत पाटील, संदीप चव्हाण, प्रकाश रावळ, स्वरूपा पेंडूरकर, शंकर गवळी, आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------
पिंपळगावला
वृक्षारोपण
गडहिंग्लज : पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील विद्यालयात ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत वृक्षारोपण केले. बहिरेवाडी शमनजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी नियोजन केले होते. मुख्याध्यापक ए. बी. लांबोरे यांनी कृषिकन्या शर्वरी मंडलिक, पल्लवी पाटील, पायल पोवार, स्वरूपा साळुंखे यांचा सत्कार केला. प्राचार्य प्रा. एम. डी. माळी, श्री. जेऊर, कार्यक्रम अधिकारी दहातोंडे यांचे मार्गदर्शन मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com