महिला सावकारांवर कारवाई

महिला सावकारांवर कारवाई

मायलेकींची सावकारीच्या फेऱ्यात फरफट
चिकन व्यावसायिकावर राहते घर, दागिने विकण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : दिवसभर भाजी विक्री तर सायंकाळी रंकाळा परिसरात चिकनचा गाडी चालवून अन्सार बागवान कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. कोरोनानंतर आर्थिक अडचणीत आल्याने त्याने घराशेजारील काही महिलांकडून हात उसणे पैसे घेतले. जून २०२१ मध्ये सुरू झालेल्या सावकारीच्या फेऱ्यात मायलेकींनी बागवान कुटुंबाला दिलेल्या पाच लाखांच्या मोबदल्यात १७ लाख वसूल केल्याची फिर्याद दाखल झाली आहे. अटकेतील कमल नलवडे, त्यांच्या मुली सुवर्णा जाधव व संगीता फडतरे या मायलेकींच्या या सावकारी फेऱ्यात बागवान कुटुंबाची फरफट झाली आहे.
बागवान यांचे जुना वाशीनाका परिसरात स्वतःचे घर होते. आर्थिक अडचणीमुळे त्यांना संगीता फडतरे हिच्यासह तिची आई कमल नलवडे, दुसरी बहीण सुवर्णा जाधव तसेच जावई सूरज गर्जेदेखील पैसे देत होता. पण, अव्वाच्या सव्वा व्याजाने झालेल्या वसुलीने बागवान कुटुंबाची वाताहत झाली.
...
राहते घर विकले....
या मायलेकींनी बागवान कुटुंबाला दिलेल्या रकमेची परतफेड करताना बागवान याला स्वतःचे राहते घर विकावे लागले आहे. व्याजाचा फेरा न फिटल्याने बागवानच्या चिकनच्या दोन्ही गाड्याही मायलेकींनी काढून घेतल्याने पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. भाजी विकून बागवान दाम्‍पत्य घर चालवत होते. तसेच इतर ठिकाणांहून कर्ज काढून त्यांनी सावकार मायलेकींचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न केला.
...
गुन्हा दाखल व्हायला लागले १३ महिने
बागवान यांच्या चिकन ६५ च्या गाड्या सावकारांनी जून २०२३ काढून घेतल्या होता. याची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली. मात्र, तपासातील दफ्तरदिरंगाई, अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे गाडा परत मिळविण्यात फेब्रुवारी उजाडला. तर सावकारीचा गुन्हा दाखल होण्यासाठी १३ महिन्यांचा कालावधी गेल्याचे बागवान यांनी सांगितले.
...
फेसबुकवर बदनामी....
व्याजाच्या हव्यासातून मायलेकींनी बागवान कुटुंबाचे जगणे मुश्किल केले होते. त्यांची सर्वत्र बदनामीही सुरू होती. फेसबुकवरून त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट पसरवून मानसिक त्रास दिल्याचेही बागवान यांनी तक्रारीत सांगितले.
...
पंधरा टक्के व्याजाचा फेरा
बागवान यांनी घेतलेल्या पाच लाखांचे कर्ज फेडण्यासाठी १७ लाख रुपये द्यावे लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सावकारीच्या धंद्यातून तब्बल पंधरा ते वीस टक्के व्याज वसूल करणाऱ्या नलवडे, जाधव व फडतरे मायलेकींच्या विरोधात आणखीन काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com