नेहरू चौकातील चिखलात घसरगुंडी

नेहरू चौकातील चिखलात घसरगुंडी

GAD42.JPG
94771
गडहिंग्लज ः शहरातील नेहरू चौकात पावसामुळे असे चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून, तेथील घसरगुंडीमुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. (आशपाक किल्लेदार ः सकाळ छायाचित्रसेवा)
------------------------------------------------------
नेहरू चौकातील चिखलात घसरगुंडी
नागरिकांतून संताप ः गडहिंग्लज पालिकेने उपाययोजना करण्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ ः महामार्गाचे काम सुसाट झाले असले तरी शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था नागरिकांना वेदना देणारी ठरत आहे. अनेक अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली असून, नेहरू चौकातील रस्त्याची पावसामुळे अवस्था बिकट झाली आहे. येथे झालेल्या चिखलाच्या साम्राज्यामुळे घसरगुंडी तयार झाली असून, दुचाकी रोज घसरत आहेत. यातून किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
येथे भुयारी गटारीच्या चेंबरचे काम गेल्या महिन्यात पूर्ण झाले आहे. त्यावेळी खाोदाई करून मोठ्या पाईप्स टाकल्या आहेत. त्यासाठी केलेल्या खाोदाईमुळे डांबरी रस्ता उखडला आहे. आता पावसाळ्यात त्याचे परिणाम जाणवत आहेत. विशेष करून दुचाकी वाहनधारकांना तेथून वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. काही दुचाकीधारक घसरून पडल्या आहेत. कालच रात्री एका दुचाकीस्वाराचा चिखलामुळे तोल गेल्याने अपघात झाला आहे. परिसरातील नागरिक व व्यावसायिकांनी वेळोवेळी पालिकेकडे मागणी करूनही येथे हार्ड मुरुमही टाकला नसल्याची तक्रार आहे.
परिसरात आठवडा बाजारही मोठा भरतो. विशेषतः धान्य, भाजीपाला बाजाराचे प्रमाण अधिक आहे. रोज सकाळी व सायंकाळी येथे भाजीपाला विक्रेते येतात. खरेदीसाठी ग्राहक मोठ्या संख्येने येतात. थोडा जरी पाऊस पडला तरीसुद्धा चिखल होत असल्याने बाजारादिवशी विक्रेत्यांना बसणे अडचणीचे ठरत आहे. तसेच भाजी व धान्याचे चिखलामुळे नुकसानही होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे पालिका प्रशासनाने तातडीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन चिखलापासून नागरिकांना मुक्त करावे, अशी मागणी होत आहे.
------------
वर्दळीचे ठिकाण
-मुख्य बाजारपेठेतील महत्त्वाचे ठिकाण म्हणून ओळख
-महालक्ष्मी मंदिरामुळे याच रस्त्यावरून नदीवेस भागातील भाविक दर्शनासाठी
-परिसर मुख्य बाजारपेठेचे ठिकाण आहे.
-व्यापारी गल्ली आणि स्टेट बॅंक असल्याने ग्राहकांचीही वर्दळ
----------
रस्तेही खड्डेमय
दरम्यान, शहरातील मुख्य रस्त्याचे रूपांतर महामार्गात झाले आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला दुचाकीधारक अंतर्गत रस्त्याचे मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे चित्र आहे,, परंतु काही अंतर्गत प्रमुख रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. परिणामी ज्येष्ठ व महिला दुचाकीधारकांना कसरत करावी लागत असून, हाडांचे आजार उद्‍भवत आहेत. यामुळे पालिका प्रशासनाने तत्काळ मुरुमाद्वारे हे खड्डे बुजविण्याची मागणी जोर धरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com