संरक्षक भिंतीशेजारी दुकान गाळे नको

संरक्षक भिंतीशेजारी दुकान गाळे नको

ajr44.jpg....
94809
आजरा ः तहसीलदार समीर माने यांना निवेदन देताना परशराम बामणे. यावेळी विजय थोरवत, वाय. बी. चव्हाण, अश्विन डोंगरे, गौरव देशपांडे आदी.
--------------
संरक्षक भिंतीशेजारी दुकान गाळे नको
अन्याय निवारण समितीची मागणी ः आजरा तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ४ ः आजरा तहसील कार्यालयाच्या संरक्षक भिंत व संकेश्वर-बांदा महामार्गामध्ये असणाऱ्या रिकाम्या जागी काही मंडळींकडून दुकान गाळे घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. अन्याय निवारण समितीसह नागरिकांचा येथे गाळे उभारण्यास विरोध आहे. येथे पार्किंगची व्यवस्था व्हावी, अशी मागणी आहे. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांना अन्याय निवारण समितीतर्फे दिले आहे.
मुळातच या परिसरात महामार्ग अत्यंत अरुंद आहे. येथे दुचाकी अथवा चार चाकी पार्किंगची कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे या अरुंद मार्गावरच दुतर्फा वाहने पार्किंग केली जातात, वास्तविक या रिकाम्या जागेत नगरपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुचाकी व चारचाकी गाडी पार्किंगची व्यवस्था केल्यास वाहनांची सोय होईल व रस्ता वाह‌तुकीस मोकळा होईल, मात्र सद्यस्थितीत विनापरवाना खोके घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. या जागी बेकायदेशीररीत्या असा प्रयत्न झाल्यास अन्याय निवारण समितीतर्फे आंदोलन छेडून वरिष्ठांकडे दाद मागण्यात येईल. ही जागा पार्किंगसाठी राखीव असून, या जागेत कोणीही अनाधिकृतरीत्या अतिक्रमण केल्यास, गाळे उभारल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे फलक नगरपंचायतीने तातडीने लावावेत, असे निवेदनात नमूद केले आहे. अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, विजय थोरवत, शिवाजी गुडुळकर, प्रकाश हरमळकर, वाय. बी. चव्हाण, जावेद पठाण, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com