गडहिंग्लज बसस्थानकाचे पालटणार रूपडे

गडहिंग्लज बसस्थानकाचे पालटणार रूपडे

Published on

GAD44.JPG ः
94816
गडहिंग्लज बसस्थानक
------------------------------------
गडहिंग्लज बसस्थानकाचे पालटणार रूपडे
दोन कोटींची तरतूद : काँक्रिटीकरणासह रंगकाम, छप्पराची होणार दुरुस्ती
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ४ : सीमाभागातील महत्त्‍वाचे आणि मोठे असलेल्या येथील बसस्थानकाचे रूपडे पालटणार आहे. स्थानकातील सर्व फलाटांचे क्राँकिटीकरण, इमारतीची रंगोरंगोटी आणि छप्पराची दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पावसाळ्यानंतर या कामाला सुरुवात होणार आहे.
जिल्ह्यात कोल्हापूर पाठोपाठ इचलकरंजी आणि गडहिंग्लज हे सर्वाधिक उत्पन्न देणारे एस. टी. आगार आहेत. दोन वर्षांपूर्वी राज्यातील आगारांच्‍या नूतनीकरणासाठी राज्य शासनाने निधी मंजूर केला आहे. त्यातील गडहिंग्लज आगाराच्या कामाची निविदा प्रक्रिया मंजूर झाली असून, पावसाळ्यानंतर कामाला प्रारंभ होणार आहे. सीमाभागातील गडहिंग्लज शहर महत्त्‍वाचे आहे. येथून कोकण, गोवा, पुणे, मुंबई, बंगळूरकडे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते. याशिवाय केजी टू पीजी अशा शिक्षणाची सुविधा असल्याने रोज दहा हजार विद्यार्थी बसस्थानकातून इच्छितस्थळी जात असतात. प्रवाशांची अधिक संख्या आणि आगाराच्या उत्पन्नाचा विचार करता त्या प्रमाणात सोयीसुविधा अपुऱ्या होत्या. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. आगाराचे छप्पर जीर्ण झाल्याने पावसाळ्यात मोठी गळती लागते. आगार परिसरात मोठे खड्डे पडल्याने चालकांना गाड्या लावणे आणि मार्गस्थ करताना त्रास सहन करावा लागतो.
आता शासनाने दिलेल्या निधीचा विनियोग होणार असल्याने प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. दोन कोटी रुपयांच्या निधीतून आगाराच्या मूलभूत गरजा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे. नुकताच या आगाराने पुणे विभागात ''अ'' गटात स्वच्छ आगाराचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. जुने छप्पर काढून नव्याने उभारण्यात येणार आहे. बसस्थानक परिसराचे रंगकामही होणार आहे. आगाराच्या सर्वच भागांत काँक्रिटीकरणाचीही यात तरतूद आहे. स्वच्छतागृहाची नव्याने उभारणी होणार आहे. या नूतनीकरणामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळण्यास मदत होईल.
------------------
इतिहास बसस्थानकाचा
गडहिंग्लज बसस्थानकाची सध्या अस्तित्वात असणारी जागा ही तिसरी होय. सुरुवातीला १९५० च्या दशकात सध्याच्या प्रांत कार्यालयासमोरील प्राथमिक शिक्षक बँकेच्या जुन्या जागेत कौलारू घरातूनच आगाराचे कामकाज चालायचे. त्यानंतर सध्या असलेल्या शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागील बाजूस पालिकेच्या जागेत शेडमध्ये बसस्थानक होते. चार फलाट तेथे कार्यरत होते. १९७० च्या सुमारास हे बसस्थानक सध्याच्या पाच एकर परिसरात स्थलांतरित झाले. त्याच ठिकाणी आगार आणि कार्यशाळा कार्यरत आहे.
------------------
दृष्‍टिक्षेपात आगाराचा विकास
- परिसराचे काँक्रिटीकरण
- छपराचे अद्यावतीकरण
- इमारतीची रंगरगोटी
- स्वच्छतागृहाची नव्याने उभारणी
--------------
दोन कोटींची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यातून काँक्रिटीकरण, रंगरंगोटी, छप्पर अद्यावतीकरणाचे काम होणार आहे. यामुळे आगारात प्रवाशांना अधिक सुविधा मिळण्यास मदत होईल.
- गुरुनाथ राणे, आगारप्रमुख, गडहिंग्लज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.