गड- मोरेंना रौप्यपदक

गड- मोरेंना रौप्यपदक

Published on

94822
सुलोचना मोरे
.......
सुलोचना मोरेंना
योगा स्पर्धेत रौप्य
गडहिंग्लज ः नेपाळमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत येथील सुलोचना विजय मोरे यांनी पारंपरिक योग प्रकारात रौप्यपदक मिळविले. दहावी इंडो-नेपाळ आंतरराष्ट्रीय स्पर्धा काठमांडूतील बोगनविला येथे झाली. ही स्पर्धा पारंपरिक, ऱ्हिदमिक एकेरी व दुहेरी योगासन अशा प्रकारांत झाली. स्पर्धेत भारतातर्फे ४५, तर नेपाळच्या ३० स्पर्धकांनी भाग घेतला. भारताने पारंपरिक योगामध्ये १४ सुवर्ण, तर ऱ्हिदमिक स्पर्धेत सहा सुवर्णपदके मिळवित स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. नेपाळ ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष राजेश श्रेष्ठ, कल्चरल असोसिएशनचे सचिव संतोष श्रेष्ठ, नेपाळ योगप्रमुख सुषमा पोडेल, ज्योत्स्ना रायरीकर, पंच अभिश्री राजपुत, वैशाली मिठकरी, शोभा पाटील, अल्पना पाडे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरविण्यात आले.
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.