कौलव

कौलव

Published on

कौलवमधील जलजीवनच्या
कामाची चौकशी करावी

शाहूनगर, ता. ४ ः कौलव (ता. राधानगरी) येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत झालेले काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, कामाची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे तालुका उपाध्यक्ष उत्तम चव्हाण यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन राधानगरीचे गटविकास अधिकारी, तहसीलदार व ग्रामीण नळ पाणीपुरवठा अभियंत्यांना दिले आहे.
निवेदनातील म्हटले आहे की, कौलव येथे जलजीवन मिशन योजनेतून नळ पाणीपुरवठा दुरुस्तीसाठी ९३ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. योजनेचे काम जानेवारी २०२३ पासून सुरू झाले. काम एका वर्षात पूर्ण करावयाचे असतानाही संबंधित पोटठेकेदाराने ते संथ गतीने केले आहे. गेल्या दीड वर्षात एक टाकी व सोलर सेट उभारला आहे. सोलर सेट गॅलवान पाईपमध्ये उभारणे गरजेचे असताना तो लोखंडी पाईपमध्ये उभारून त्याला रंगरंगोटी केली आहे. त्यामुळे पुराचे पाणी येऊन सेट गंजून पुढील काही वर्षांत तो कोसळणार आहे. याबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सूचना करूनही ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. उभारलेला सेट महापुरात वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया जाणार आहेत. या कामाची विभागीय चौकशी करून सोलरसाठी उभारलेला सेट गॅलवानमध्ये उभा करावा, अन्यथा ग्रामपंचायतीसमोर उपोषण करू.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.