अधिवेशनातून- सतेज पाटील

अधिवेशनातून- सतेज पाटील

अधिवेशनातून : लोगो
...
राज्यातील गुंठेवारी नियमित
करण्याची अर्ज प्रक्रिया सुरूच ठेवा
आमदार सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : ‘राज्यातील गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्यासाठी महापालिकांनी ठराविक मुदत न ठेवता ही प्रक्रिया सुरूच ठेवावी’, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज अधिवेशनात केली. त्यावर नगरविकास विभागाच्यावतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत सरकार सकारात्मक असून, प्रत्येक महानगरपालिकेशी बोलून निर्णय घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.
‘राज्यात २०२० पर्यंतची गुंठेवारी प्रकरणे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी महापालिका ठराविक मुदत ठरवते. मुदतीत ज्यांचे अर्ज आले आहेत, त्यांचीच प्रकरणे नियमित करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, अनेकांनी यासाठी अर्ज केलेले नाहीत. सरकार २०२० पर्यंतचीच गुंठेवारी प्रकरणे नियमित करणार आहे. त्यामुळे ही अर्ज करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवावी’, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
...
मिळकत पत्रिकेचा प्रश्न प्रलंबित...
कोल्हापूर शहरालगतचे उपनगर त्याचबरोबर ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे साठ हजार मिळकतधारकांच्या मिळकत पत्रिकेचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्‍याने त्याचा सर्व्हे करण्यासाठी ११ कोटी २१ लाख ७३ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबत राज्य सरकारने कार्यवाही करण्याची मागणीही आमदार पाटील यांनी विधान परिषदेत केली. त्यावर बोलताना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com