दूध संकलन अडीच लाखाने वाढले

दूध संकलन अडीच लाखाने वाढले

Published on

अडीच लाख लिटरने वाढले
‘गोकुळ’ चे दूध संकलन
सर्वाधिक दूध खरेदी दराचा परिणाम : १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) दूध संघाकडून दूध खरेदी दराला सर्वाधिक दर दिला जात आहे. जातिवंत म्हशीसाठी तीस हजारांवरून चाळीस हजार रुपयांचे दिले जाणारे अनुदान आणि गोकुळ श्री पुरस्काराची रक्कम एक लाख रुपये केल्यामुळे गोकुळकडे दूध संकलन वाढत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी गोकुळचे दूध संकलन अडीच लाख लिटरने वाढले आहे. गोकुळने सध्या १८ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार केला आहे.
गोकुळकडून २०२३-२४ मध्ये म्हैस दूध खरेदीसाठी प्रतिलिटर सरासरी ५८ रुपये ५४ पैसे व गाय दुधासाठी प्रतिलिटर सरासरी ३८ रुपये ३७ पैसे (जादा दर व दरफरक सहित) दर दिला आहे. हा दर राज्यातील सर्वाधिक दर मानला जात आहे. गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना शासनाने ठरवून दिलेल्या किमान दरापेक्षा सहा रुपये जादा दर दिला जात आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे सहा लाख पाच हजार लिटर गायीचे दूध संकलित होते. त्यानुसार दिवसाला ३९ लाख रुपये, तर महिन्याला ११ कोटी ७० लाख रुपये जिल्ह्यातील दूध उत्पादकांना दिले जात आहेत. याचबरोबर राज्य शासनाकडून पाच रुपये गाय दूध अनुदान दिले जात आहे. गोकुळचा दूध उत्पादक शासनाचे अनुदान म्हणून १४ कोटी ५८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. हे अनुदान उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. सभासद हिताच्या राबविलेल्या विविध योजना राबवत उत्पादकांना राज्यातील सर्वाधिक दर देणे शक्य झाल्याचे चित्र आहे.
...
‘गोकुळ दूध उत्पादकांच्या दुधाला राज्यात सर्वाधिक दर दिला जात आहे. गोकुळकडून वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट गाठणे, म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी आणखी प्रोत्साहन योजना राबविणे, गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी मार्केटिंग यंत्रणा सक्षम केली जात आहे. त्यामुळे गोकुळकडे दूध संकलनातही अडीच लाख लिटरची वाढ झाली आहे.’
अरुण डोंगळे,
अध्यक्ष, गोकुळ दूध संघ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.