चंदगडला सतर्कतेचा इशारा

चंदगडला सतर्कतेचा इशारा

Published on

94861
भोगोली ः घटप्रभा नदीवरील बंधारा पाण्याखाली गेला आहे.
...
घटप्रभा, ताम्रपर्णीकाठच्या
गावांना सतर्कतेचा इशारा
दोन्ही नद्यांवरील बारा बंधारे पाण्याखाली
चंदगड, ता. ४ ः तालुक्याच्या पश्चिम भागात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असून घटप्रभा व ताम्रपर्णी या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. घटप्रभेवरील पिळणी, भोगोली, गवसे, हिंडगाव, कानडी, अडकूर, कानडेवाडी, तारेवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर ताम्रपर्णी नदीवरील कोकरे, आसगाव, कुर्तनवाडी व हल्लारवाडी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. फाटकवाडी व जांबरे या दोन्ही प्रकल्पांतून वीज निर्मितीसाठी पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेले दोन दिवस पश्चिम भागात घटप्रभा व ताम्रपर्णी नदी क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पावसाचे प्रमाण जास्त असले तरी सलगपणा नसल्यामुळे पूरस्थिती फारशी गंभीर नसली तरी दोन्ही नद्यांचे पाणी पात्राबाहेरून वाहत आहे. फाटकवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे वीज निर्मितीसाठी ९०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. त्यामुळे नदी क्षेत्रात कोसळणारा पाऊस व प्रकल्पातून सोडलेले पाणी यामुळे पाणी पातळी वाढून बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर जांबरे प्रकल्पातून २३० क्युसेकने वीज निर्मितीसाठी विसर्ग सुरू असल्याने या नदीच्या पातळीतही मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, यावर्षी जून महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नसला तरी जुलैल्या पहिल्याच आठवड्यात पावसाने चांगली सलामी दिली आहे. हा पाऊस भाताच्या रोप लावणीसाठी उपयुक्त ठरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.