महेश कदम विभागीय सहनिबंधकपदी नियुक्त

महेश कदम विभागीय सहनिबंधकपदी नियुक्त

Published on

94872

महेश कदम यांनी स्वीकारला
सहकार सहनिबंधकपदाचा पदभार

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ४ : सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकपदी महेश कदम यांनी आज पदभार स्वीकारला. एक महिन्यापूर्वी तत्कालीन सहनिबंधक अरुण काकडे हे निवृत्त झाले. त्यानंतर पुण्यातील स्नेहा जोशी यांची पदोन्नतीवर येथे बदली करण्यात आली. त्या ३० जुनला कार्यभार स्वीकारणार होत्या. दरम्यानच्याकाळात उपनिबंधक निळकंठ करे यांच्याकडे पदभार होता. याचवेळी जोशी यांची नियुक्ती पुण्यात झाली. त्यामुळे कदम यांची कालच पदोन्नतीवर कोल्हापूरला नियुक्ती झाली. त्यानंतर आज त्यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वीही त्यांनी कोल्हापुरात काम केले आहे.
श्री. कदम हे विभागीय उपनिबंधक दुग्ध (पुणे) येथे कार्यरत होते. त्यांच्याकडे पाच जिल्ह्यांचा कार्यभार होता. आता ते सहकारी संस्थांचे सहनिबंधक म्हणून काम पाहणार आहेत. आगामी काळात प्रशासन सक्षमीकरण, संगणकीकरण करण्यावर भर असेल, असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.