मतदानकेंद्रांची संख्या वाढवा ः भाजपची मागणी

मतदानकेंद्रांची संख्या वाढवा ः भाजपची मागणी

मतदान केंद्रांची संख्या वाढवा,
मतदार यादीतील त्रुटी दूर करा
भाजपची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांची संख्या वाढवावी. तसेच मतदार यादीतील दुबार नावे, नावातील त्रुटी दुरुस्त कराव्यात, अशी मागणी भाजपने केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, २७६ कोल्हापूर उत्तर विधानसभेत एकूण ३११ बूथ येतात. उत्तर विधानसभेतील अनेक बूथवर एक हजारांपेक्षा जास्त मतदार आहेत. याबरोबरच ८५ वयोगटांवरील मतदारांची संख्या ५२६६ असून, दिव्यांग २५०० मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. तसे सूचित केले असूनसुद्धा अनेक बूथवर मतदारांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर विधानसभेमध्ये येणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या वाढवावी, मतदारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. एका बूथमध्ये एक हजारांपेक्षा जास्त मतदार असतात त्या ठिकाणी मतदारांची दिवसभर मतदान करण्यासाठीची वर्दळ असते. ही वर्दळ पाहून अनेक नागरिक मतदान करणे टाळतात. त्यासाठी एका बूथमध्ये एक हजारांपेक्षा जास्त मतदार असू नयेत, तसेच एका मतदान केंद्रामध्ये ६ ते १० बूथ असतील, तर त्या ठिकाणची मतदारांची संख्या ही अधिक असते. मतदार यादीतील काही चुकांमुळे मतदार संभ्रम अवस्थेत केंद्राबाहेर घुटमळत राहतो, त्यामुळे गर्दी होताना आढळते. तरी त्या भागातील इतर महानगरपालिका, खासगी शाळेच्या ठिकाणी मतदान केंद्र स्थापित झाले तर नागरिकांना मतदान करणे सोपे जाईल, याबाबत कार्यवाही व्हावी.
यावेळी सरचिटणीस डॉ. सदानंद राजवर्धन, हेमंत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, विराज चिखलीकर, शैलेश पाटील, संगीता खाडे, संतोष भिवटे, रोहित पोवार, विशाल शिराळकर, अभिजित शिंदे, सुधीर देसाई, गिरीष साळोखे, अनिल कामत, सतीश आंबर्डेकर, किसन खोत, रविकिरण गवळी, प्रवीणचंद्र शिंदे, महादेव बिरंजे, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com