कोल्हापूर जिल्ह्यात नवीन ११ हजार वीज जोडण्या

कोल्हापूर जिल्ह्यात नवीन ११ हजार वीज जोडण्या

कोल्हापूर जिल्ह्यात नवीन
११ हजार वीज जोडण्या
सहा महिन्यांतील चित्रः महावितरणची नवीन सेवा जोडणी योजना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : महावितरणने नवीन सेवा जोडणी योजनेंतर्गत गेल्या सहा महिन्यांत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात १९ हजार ५५३ नवीन वीज जोडण्या दिल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ११ हजार ४७ वीज जोडण्यांचा समावेश आहे.
नवीन सेवा जोडणी योजनेतून (एनएससी) अकृषक वर्गवारीतील ग्राहकांना नवीन वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्याची आवश्यकता असल्यास ती महावितरणकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकास कोणताही खर्च करावा लागणार नाही. नवीन ग्राहकांना केवळ सेवा जोडणी शुल्क व सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागेल. याकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्धारित केलेल्या कृती मानकांनुसार कालमर्यादेचे पालन केले जाईल, असे यापूर्वीच महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात नवीन सेवा जोडणी योजनेतून ११ हजार ४७ वीज जोडण्या दिलेल्या आहेत. त्यात पायाभूत सुविधांची आवश्यकता नसलेल्या घरगुती वर्गवारीत ७८२५, व्यावसायिक २०३०, औद्योगिक २६३ अशा एकूण १० हजार ११८ वीजजोडण्यांचा समावेश आहे. तर महावितरणच्या खर्चाने आवश्यक पायाभूत विद्युत सुविधांची उभारणी करून घरगुती वर्गवारीत ७९२, व्यावसायिक ७८, औद्योगिक ५९ अशा एकूण ९२९ वीज जोडण्या दिलेल्या आहेत. सांगली जिल्ह्यात नवीन सेवा जोडणी योजनेतून आठ हजार ५०६ वीज जोडण्या दिल्या आहेत. त्यात पायाभूत सुविधांची आवश्यकता नसलेल्या घरगुती वर्गवारीत ५६४८, व्यावसायिक ११२, औद्योगिक ८३ अशा एकूण ६७४३ वीजजोडण्यांचा समावेश आहे. तर महावितरणच्या खर्चाने आवश्यक पायाभूत विद्युत सुविधांची उभारणी करून घरगुती वर्गवारीत १३६९, व्यावसायिक ३२७, औद्योगिक ६७ अशा एकूण १७६३ वीज जोडण्या दिलेल्या आहेत, अशी माहिती महावितरणकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com