सकाळ नाट्य महोत्सव

सकाळ नाट्य महोत्सव

94873, 94874
लोगो
...
विश्वासाच्या बळावर संसाराचा धागा होतो घट्ट
सकाळ नाट्यमहोत्सवाची सांगताः ‘नियम व अटी लागू’ला रसिकांचा भरभरून प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः नवरा - बायकोत होणारे वाद, संसार जोडायचा की थांबवायचा, यावर दोघांचा संभ्रम होतो. समुपदेशक, नातेवाईक यांचे सल्ले घेणे सुरू होते. यातून होणाऱ्या गमतीजमती ‘नियम व अटी लागू’ या नाटकाने बहारदारपणे मांडल्या. त्याचा अनुभव देत रसिकांना मनमुराद हसविले आणि जाता जाता विश्वासाच्या बळावर संसाराचा धागा अधिक घट्ट विणला जातो, याचा वास्तवदर्शी संदेशही दिला.
चितळे डेअरी प्रस्तुत सकाळ नाट्यमहोत्सवात आज दुसऱ्या दिवशी ‘नियम व अटी लागू’ हे नाटक सादर झाले. त्याला रसिकांचा तुडुंब प्रतिसाद लाभला.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या नाट्य महोत्सवाची आज ‘नियम व अटी लागू’ या कौटुंबिक विनोदी नाटकाच्या सादरीकरणाने सांगता झाली. या नाटकात अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद बर्वे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या प्रमुख भूमिका होत्या. दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांचे होते. संगीत अशोक पत्की यांचे होते. संकर्षण यांनीच या नाटकाचे लेखन व प्रमुख भूमिका केली. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे होते.
नोकरी करून दमून भागून येणारा नवरा, तर नवऱ्याची प्रतीक्षा करीत दिवसभर घरात कंटाळून जाणारी पत्नी. ‘तू मला वेळ देत नाहीस’, ‘त्याचे तुला काही वाटत नाही’ असे सांगत त्रागा करणारी पत्नी, ‘मला काही वाटायचे म्हणजे नेमके काय करायचे’ असा उलट प्रतिप्रश्न करीत हतबल होणारा नवरा. यातून सुरू होणारा वाद समुपदेशकांकडे जातो, तसे नाटक उलगडत जाते. अचूक संवादफेक, लवचिक देहबोलीद्वारे क्षणाक्षणाला विनोद निर्मिती या बलस्थानावर नाटक रंगत गेले.
‘सकाळ’चे सरव्यवस्थापक (दक्षिण महाराष्ट्र) यतिश शहा यांनी स्वागत केले. ‘सकाळ’तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. चितळे डेअरी (सांगली)चे दिलीप आपटे, सहप्रायोजक बटू बिल्डर्सचे संचालक श्रीनिवास गायकवाड, निलकमल फर्निचरचे सचिन सुराणा, शिवसमर्थ मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीचे शाखा सल्लागार संतोष पवार - देसाई यांचे सरव्यवस्थापक श्री. शहा व ‘सकाळ’चे सहायक सरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके यांच्या हस्ते स्वागत झाले. श्री. आपटे यांच्या हस्ते नाटकाचे मुख्य कलावंत अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांचा, श्री. गायकवाड यांच्या हस्ते अभिनेत्री अमृता देशमुख यांचा, तर श्री. पवार - देसाई यांच्या हस्ते अभिनेते प्रसाद बर्वे यांचे सत्कार झाले. अजिंक्य पंडित यांनी निवेदन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com