पत्र

पत्र

Published on

परवानगी देताना...
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील पुलराई गावांमध्ये ‘भोले बाबा’ ऊर्फ ​​बाबा नारायण हरी ऊर्फ ​​साकार विश्व हरी यांच्या धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ भक्तांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना सर्वात मोठी वेदनादायी आहे. सत्संग आटोपल्यानंतर भोले बाबा गाडीत बसून निघाले असता, त्यांचे दर्शन घेण्यासाठी अनुयायांचा जमाव त्यांच्या मागे धावला. बाबांचा पाय जिथे पडेल तेथील माती उचलण्याची अनुयायांमध्ये प्रथा आहे. रस्त्याच्या खाली पाणी आणि चिखलाने भरलेली शेती होती. लोक निसरड्या जमिनीमुळे पाण्यात आणि चिखलात पडले. बहुतांश लोकांचा मृत्यू गुदमरल्याने आणि चिरडल्याने झाल्याचे समोर आले आहे; परंतु आयोजकांकडून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही ठोस व्यवस्था केली नव्हती. कार्यक्रमस्थळी प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी कोणतेही विशिष्ट गेट नव्हते. बॅरिकेडिंगद्वारे रेषाही आखलेल्या नव्हत्या. तसे असते तर ही परिस्थिती टाळता येऊ शकली असती. त्यासाठी सरकारने अशा कार्यक्रमांना परिस्थिती पाहूनच परवानगी देणे गरजेचे आहे.
- राजू जाधव, मांगूर जि. बेळगाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.