गजानन पतसंस्थेचे संजय खोत अध्यक्ष

गजानन पतसंस्थेचे संजय खोत अध्यक्ष

Published on

GAD51.JPG ः
94891
संजय खोत, गौरव देशपांडे

गजानन पतसंस्थेचे
संजय खोत अध्यक्ष
गडहिंग्लज : येथील गजानन नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संजय खोत यांची, तर उपाध्यक्षपदी गौरव देशपांडे यांची बिनविरोध निवड झाली. सहकार विभागाचे सहायक निबंधक अमित गराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड केली. खोत यांचे नाव श्रीपाद जोशी यांनी सुचवले. यशवंत कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले. देशपांडे यांच्या नावाला अनंत कुलकर्णी सूचक असून, मारुती वाळकी अनुमोदक आहेत.
-----------------------------------------
रविवारपासून
हलकर्णीत मोहरम
नूल : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मोहरम सण रविवारपासून (ता. ७) सुरू होणार आहे. या दिवशी कुदळ मारून सणाला प्रारंभ होईल. गुरुवारी (ता. ११) पाचवी विधी होणार असून, यादिवशी मध्यरात्री बडे पीर-छोटे पीर दोन्ही दर्ग्यांत पंजे प्रतिष्ठापना करणे, सोमवारी (ता. १५) खत्तल रात्र, दुसऱ्या दिवशी मंगळवारी (ता. १६) ताबूत विसर्जन करण्यात येईल.
-------------------------------------------
माकडांचा
जरळीत धुमाकूळ
नूल : जरळी (ता. गडहिंग्लज) येथे माकडांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या त्रासाला नागरिक वैतागले आहेत. वन विभागाने माकडाच्या कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. दोन महिन्यांपासून जरळीत पंधरा-वीस माकडांचा कळप दाखल झाला आहे. नागरिकांनी कितीही या कळपाला हुसकावले तरी गावातच ठाण मांडून आहे. पावसाळ्यात या कळपाने गावात उच्छाद मांडला आहे. यामुळे नागरिक वैतागलेले आहेत. घरावरील कौले फुटत असल्याने नुकसान होत असून, पाण्याच्‍या सिंटेक्स टाक्‍या तसेच सोलर यंत्रणेचीही मोडतोड करीत असल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
-------------------------------------------
महाराष्ट्र प्रशालेत
गुणवंतांचा गौरव
गडहिंग्लज : अत्याळ येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. ओंकार महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. संजीवनी पाटील प्रमुख पाहुण्या होत्या. डॉ. पाटील यांनी स्वतःमधील सुप्तगुण शोधूनच करिअर निवडण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. एन. एल. कांबळे अध्यक्षस्थानी होते. पुस्तके भेट देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. पी. आर. पवार, वैष्णवी देवरकर, मधुरा चोरगे, शुभांगी खडके यांनी मनोगत व्यक्त केले. एस. व्ही. गुरव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. एम. डी. अडसुळे यांनी सूत्रसंचालन केले. टी. एन. पालकर यांनी आभार मानले.
-----------------------------------------------
सर्वोदय स्कूलमध्ये
निवडणुका उत्साहात
गडहिंग्लज : येथील सर्वोदय स्कूलमध्ये शालेय स्तरावरील निवडणुका उत्साहात झाल्या. त्यानंतर मंत्रिमंडळाची स्थापना केली. गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया राबवली. अपक्ष गटातून विद्यार्थिनी प्रतिनिधीपदी लौकीक गुजर, महाविकास आघाडीतून विद्यार्थी प्रतिनिधीपदी आयुष करिगार विजयी झाले. संतोष चिकोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. त्यात सृष्टी मोरबाळे, विराज भोगण, विजया तोदली, पृथ्वीराज पाटील, रेयांश कांबळे, तन्वी मोहिते यांचा समावेश आहे. संस्थेचे सचित रवींद्र बेळगुद्री अध्यक्षस्थानी होते. चिकोडे यांनी मार्गदर्शन केले.
---------------------------------------------------
‘कित्तूरकर’मध्ये
डॉक्टर्स डे
गडहिंग्लज : येथील रावसाहेबअण्णा कित्तूरकर महाविद्यालयात डॉक्टर्स डे उत्साहात झाला. डॉ. सुजित काशिद यांनी हृदय विकारावरील प्रथमोपचारांबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. डॉ. सविता निकम, डॉ. ख्वाजा मुजावर, डॉ. महेश केंबळे, डॉ. ऋषभ कासार, डॉ. चंद्रकांत हेब्बाळे, डॉ. सर्वेशकुमार चौगुले या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. प्राचार्य विजय चौगुले अध्यक्षस्थानी होते. उमेश सावंत, विद्या पन्हाळे, आदी उपस्थित होते. नूतन पाटील, प्रियंका जगताप यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वप्नाली गायकवाड यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.