‘झेप’ केंद्रास आयुक्तांची भेट

‘झेप’ केंद्रास आयुक्तांची भेट

Published on

‘झेप’ केंद्रास
आयुक्तांची भेट
इचलकरंजी : शहरात बी‌एसएनएल कार्यालयाच्या समोर गतिमंद मुलांसाठी झेप अध्ययन अक्षम केंद्र चालवण्यात येत आहे. येथे शहरातील विविध वयोगटांतील आणि पहिली ते दहावीपर्यंतची सुमारे २५ गतिमंद मुले शिक्षण घेत आहेत. केंद्रात आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी तेथील मुलांशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. शिक्षकांनी अध्ययन केंद्र चालवताना येत असलेल्या काही अडचणी मांडल्या. महापालिका आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही आयुक्त दिवटे यांनी दिली. यावेळी नंदा चंदुरे, अजय शेळके, रेखा तेलवेकर, आकांक्षा गिरी, आदी शिक्षक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.