आजरा ः रस्ता बंद करण्याचा इशारा

आजरा ः रस्ता बंद करण्याचा इशारा

Published on

आजरा - महागाव
नियमित एसटी सोडा
आजरा, ता. ५ ः आजरा- महागाव महामार्गावर नियमित एसटी सेवा सुरू करावी; अशी मागणी कानोली ग्रामपंचायतीने केली आहे. तसेच कानोली येथे मुक्कामी एसटी सोडावी; अशीही मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा आगारप्रमुखांना दिले आहे. आजरा - महागाव मार्गावर नियमित एसटीची सोय नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार यांची गैरसोय होत आहे. यामध्ये मलिग्रे, कानोली, दाभेवाडी, सरबंळवाडी, हारुर या गावांतील प्रवासी, विद्यार्थी व नोकरदारांचे हाल होत आहेत. अनेकदा पायपीट करत मार्गक्रमण करावे लागते. खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे प्रत्येकी एक तासाने या मार्गावर एसटी सोडावी. कानोली येथे मुक्कामी एसटी सोडावी. निवेदनावर सरपंच सुषमा सुभाष पाटील यांची सही आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.