आम्ही लाडक्या बहिणी नव्हे का ?

आम्ही लाडक्या बहिणी नव्हे का ?

gad54.jpg
94970
गडहिंग्लज ः पेन्शनधारक व ६५ वर्षांवरील महिलांना माझी लाडकी बहीण योजनेत समाविष्ट करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना दिले.
-----------------------------------------------
आम्ही लाडक्या बहिणी नव्हे का?
पेन्शनधारकांचा सवाल ः कळवीकट्टेतील महिला शिष्टमंडळाने वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ ः संजय गांधी निराधार योजनेतील पेन्शन घेणाऱ्या महिला आणि ६५ वर्षांवरील महिला मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाहीत का? असा सवाल कळवीकट्टेतील महिलांच्या शिष्टमंडळाने विचारला आहे. या घटकांना १५०० रुपये लाभापासून वंचित ठेवल्याबद्दल महिलांनी रोष व्यक्त केला.
याबाबत तहसीलदार ऋषिकेत शेळके यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून निराधार पेन्शनधारक महिला व ६५ वर्षांवरील महिलांना वंचित ठेवले आहे. निराधार पेन्शनधारक महिलांना कोणताच आधार नाही. या महिला लाडक्या बहिणी ठरत नाही का. लाडक्या बहिणीचे माहेरच्या आहेरापासून या महिला वंचित राहणार आहेत. अशा महिलांनाच माझी लाडकी बहीण योजनेचा जास्त गरज आहे. मुख्यमंत्र्यांच्या दृष्‍टिकोनातून ६५ वर्षांवरील महिला व निराधार महिला लाडकी बहीण ठरलेल्या नाहीत. या घटकांना वंचित ठेवून ही नवी योजना पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे या दोन्ही घटकांना योजनेत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी आहे. सरिता देसाई, सुलोचना चौगुले, मीनाक्षी सावंत, साखरूबाई सुळेभावीकर, सुवर्णा आमनगी, द्राक्षायणी हळीज्वाळे, कलावती हळीज्वाळे, सुशीला देसाई, कमल कोकितकर, अनुसया पाटील, सुशाबाई निकम, अनुसया पोवार आदी महिलांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com