संमतीपत्र

संमतीपत्र

Published on

प्रति,

विषय- ‘स्वराभिषेक’मधील लेख पुस्तकरूपाने पुनर्प्रकाशित करण्यास संमतीपत्र...

सप्रेम नमस्कार,

ॅ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्तीच्या वतीने ‘स्वराभिषेक’ हा दिवाळी अंक २०२२ मध्ये प्रकाशित करण्‍यात आला होता. त्यामध्ये आपला लेख समाविष्ट होता. त्या दिवाळी अंकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता.
‘स्वराभिषेक’ दिवाळी अंकात आपल्यासारख्या संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विचार व अनुभव मांडले होते. क्यूआर कोडच्या माध्यमातून लेखासोबत मैफलीचा व्हिडिओ देण्‍याचा अनोखा प्रयोगही केला होता. त्यास वाचक, संगीतप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. दिवाळी अंकातील वाचनीय साहित्य पुस्तकरूपाने प्रकाशित करावे, अशी मागणी वाचकांनी ‘सकाळ’कडे केली होती. संगीतविषयक अनुभव आणि विचारांचा ठेवा पुस्तकाच्या माध्यमातून कायमस्वरूपी उपलब्ध व्हावा, असे ‘सकाळ’ प्रकाशनास वाटते. ‘स्वराभिषेक’ दिवाळी विशेषांकातील आपला लेख पुस्तकात प्रसिद्ध करण्यास परवानगी द्यावी, ही विनंती. कृपया आपली परवानगी लिखित स्वरूपात आम्हास ईमेलद्वारे प्राप्त व्हावी. धन्यवाद.


कळावे,


निखिल पंडितराव
संपादक, सकाळ-कोल्हापूर.


9881099131
nikhil.panditrao@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.