‘न्यू हायस्कूल’, ‘विमला’, ‘महाराष्ट्र’चे विजय

‘न्यू हायस्कूल’, ‘विमला’, ‘महाराष्ट्र’चे विजय

Published on

95043
कोल्हापूर : सुब्रतो मुखर्जी चषक फूटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर विरुद्ध न्यू मॉडेल स्कूल यांच्या सामन्यातील क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
.....
‘न्यू हायस्कूल’, ‘विमला’, ‘महाराष्ट्र’चे विजय

सुब्रतो मुखर्जी १७ वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धा ः दिवसभरात १२ सामने

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः सुब्रतो मुखर्जी १७ वर्षांखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत न्यू हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश मीडियम, महाराष्ट्र हायस्कूल आदींनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. विभागीय क्रीडा संकुलात आज एकूण १२ सामने झाले. यात न्यू हायस्कूलने वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूलचा चार विरुद्ध दोन असा टायब्रेकरवर पराभव केला. विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलने श्रीपतराव बोंद्रे इंग्लिश मीडियम स्कूलचा दोन विरुद्ध शून्य असा पराभव केला.
राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूलने शाहू दयानंद हायस्कूलचा तीन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. श्रीनाथ बकरेने दोन, तर शौर्य थोरातने एका गोलची नोंद केली. महाराष्ट्र हायस्कूलने महावीर इंग्लिश स्कूलला तीन विरुद्ध शून्य गोलने पराभूत केले. यात सम्राट मोरबाळेने दोन, तर संचित उपलानीने एका गोलची नोंद केली. दादासाहेब मगदूम हायस्कूलने कोल्हापूर इंग्लिश मीडियम स्कूलला तीन विरुद्ध दोन गोलने टायब्रेकरवर पराभूत केले. न्यू हायस्कूलने देशभूषण हायस्कूलचा तीन विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. न्यू हायस्कूलकडून गौरव हुजरेने दोन, तर शुभम तडाखेने एका गोलची नोंद केली. विमला गोयंका इंग्लिश स्कूलने हनुमंतराव चाटे स्कूलला दोन विरुद्ध शून्य गोलने पराभूत केले. वरद पाटील व अर्श हकीम यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली. शांतिनिकेतन स्कूलने न्यू इंग्लिश मीडियम स्कूल (संभाजीनगर) चा एक विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. हा विजयी गोल नीव नरसिंघानीने केला. प्रायव्हेट हायस्कूलने संजीवन इंग्लिश स्कूल (कदमवाडी) चा एक विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. हा एकमेव गोल दीपराज पोलादेने नोंदविला. महाराष्ट्र हायस्कूलने दादासाहेब मगदूम हायस्कूलचा पाच विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. यात सम्राट मोरबाळेने दोन, प्रतीक इंगवले, साईराज सुतार, राजगुरू जाधव यांनी प्रत्येकी एका गोलची नोंद केली. छत्रपती शाहू विद्यालय (एसएससी) संघाने पोदार स्कूलचा एक विरुद्ध शून्य गोलने पराभव केला. हा एकमेव विजयी गोल पृथ्वीराज चव्हाणने नोंदविला. शनिवार (ता. ६) पासून १७ वर्षांखालील मुलींचे सामने होणार आहेत.
...............
चौकट...
अटीतटीची लढत
न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलने सेंट झेविअर्स हायस्कूल यांच्यातील लढत अत्यंत अटीतटीची झाली. संपूर्ण वेळेत हा सामना दोन विरुद्ध दोन असा राहिला. त्यामुळे पंचांनी टायब्रेकरचा अवलंब केला. यात न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलने बाजी मारली. हा सामना चार विरुद्ध दोन गोलने टायब्रेकवर जिंकला.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.