बस डेपोला नोटीस

बस डेपोला नोटीस

95074
...

एसटीच्या ताराबाई पार्कमधील
वर्कशॉपमध्ये डेंगी डासांच्या अळ्या
महापालिकेकडून नोटीस; शहरात १९६६ भांड्यांतही डासअळ्या

कोल्हापूर, ता. ५ : पितळी गणपतीजवळील एसटी वर्कशॉपच्या सर्वेक्षणात डेंगी, चिकुनगुण्याच्या डासांच्या अळ्या व अंडी मोठ्या प्रमाणात आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे. त्या परिसरात औषध व धूर फवारणी करण्यात आली आहे. दरम्यान, आज केलेल्या तपासणीत १९६६ इतक्या प्रचंड संख्येच्या भांड्यांमध्ये डेंगी डासांच्या अळ्या सापडल्या आहेत.
शहरात डेंगी, चिकुनगुण्याच्या अळ्या सापडत आहेत. तसेच रुग्णांचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तपासणी करण्याबरोबरच कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. दैनंदिन कंटेनर सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवले आहे. आज पाणी साठवण्याच्या ५९८४ भांड्यांची तपासणी केली असता त्यातील १९६६ भांड्यांमध्ये डेंगी डासांच्या अळ्या आढळल्या. सरदार तालीम, फिरंगाई मंदिर, शिवाजी पेठ, रजारामपुरी, यादवनगर, शाहूनगर, शाहूपुरी, मातंग वसाहत, दौलतनगर, जागृतीनगर, प्रतिभा नगर, सम्राटनगर, पांजरपोळ, पाटोळेवाडी, निंबाळकर मार्ग, न्यू शाहूपुरी, ताराबाई पार्क, कनाननगर, नाना पाटीलनगर, बोंद्रे नगर, आपटेनगर, वाशी नाका, दत्त चिले कॉलनी, रुईकर कॉलनी, माकडवाला वसाहत, टेंबलाईवाडी, टाकाळा, नेहरूनगर, सुभाषनगर, जवाहरनगर, नागाळा पार्क, शिवाजी पार्क या परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. या भागामध्ये आशा सेविकांमार्फत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी स्वच्छ पाणीसाठा आठवड्यातून एकदा रिकामा करून कोरडा दिवस पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले.
ताराबाई पार्कमधील एसटी वर्कशॉपची तपासणी केली असता तिथे साहित्यात साठलेल्या पाण्यात डेंगी, चिकुनगुण्याच्या डासांच्या अळ्या सापडल्या. त्यामुळे आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांच्या सूचनेनुसार वर्कशॉपच्या अधिकाऱ्यांना साथरोग अधिनियम १८५७ अंतर्गत नोटीस बजाविण्यात आली. कसबा बावडा येथील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राने सर्वेक्षण केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पुलकीत खंबायते, डॉ. निखिल पाटील, डॉ. आरती बिराजदार, समन्वयक नितीन जाधव, दीपाली सातवेकर, मनीषा धनवडे, पल्लवी गवळी, दीपाली कोतलीकर, स्वाती बिरंगे, अस्मिता कांबळे, विनोद कांबळे, संदीप कर्ले उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com