पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

पाण्यासाठी महिलांचा रास्ता रोको

Published on

पाण्यासाठी महिलांचा ‘रास्ता रोको’
इचलकरंजी, ता. ५ ः येथील लालनगरमधील महिलांनी आज सायंकाळी पाणीप्रश्‍नी थोरात चौकात घागरींसह ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे चौकात येणारी वाहतूक ठप्प झाली होती. पाणी पुरवठा विभागाकडील शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांनी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. सध्या निरामय रिंग रोडवर कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळे लालनगर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीला गळती लागली. परिणामी, लालनगर परिसरात आज सायंकाळी अपुरे पाणी आले. त्यामुळे संतप्त महिलांनी घागरीसह थोरात चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या चौकात येणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. शाखा अभियंता कांबळे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. पाणी सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सदा मलाबादे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.