इचलकरंजीत भुयारी गटार योजना मार्गा

इचलकरंजीत भुयारी गटार योजना मार्गा

इचलकरंजीत भुयारी गटार योजना मार्गी
४८८ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी ः सांडपाण्याचा प्रश्‍न लागणार मार्गी
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ ः शहरासाठी महत्त्‍वकांक्षी असलेली ४८८ कोटी रुपये खर्चाच्या भुयारी गटार योजनेच्या प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विकास विभागाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कामाची तातडीने निविदा काढण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कार्यादेश दिल्यापासून योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांची मुदत असणार आहे. या योजनेमुळे शहरातील निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रियेचा प्रश्न कायमचा निकालात निघणार आहे.
शहरात दररोज ३८ एमएलडी सांडपाणी तयार होते. प्रत्यक्षात केवळ २० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. १८ एमएलडी पाणी विनाप्रक्रिया पंचगंगा नदीत सोडले जाते. त्यामुळे इचलकरंजीतील सांडपाण्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. याबाबत महापालिकेवर सतत कारवाई टांगती तलवार आहे. पण हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर १०० टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. शहराच्या वाढीव भागासह अस्तित्वातील भुयारी गटर योजनेची बळकटी यातून केली जाणार आहे. या योजनेच्या मंजुरीसाठी खासदार धैर्यशील माने व आमदार प्रकाश आवाडे यांनी विशेष प्रयत्न केले.
----
योजना दृष्‍टिक्षेप

पंपिंग स्टेशन - १५ एमएलडी व २२.५ एमएलडी
भुयारी गटारीचे अंतर - ३३८ किलोमीटर
पाईप आकार - २०० व ९०० मिमी
चंदूर एसटीपी (१) - १३ एमएलडी
टाकवडे वेस एसटीपी (२) - १९.५ एमएलडी
-----
वित्तीय आकृतीबंध

योजना किमत - ४८८ कोटी ६७ लाख
राज्य शासन अनुदान (७० टक्के) - ३४२ कोटी ७ लाख
महापालिका हिस्सा (३० टक्के) - १४६ कोटी ६० लाख
---------
निधी वितरण कार्यपद्धती

* कार्यादेश दिल्यानंतर पहिल्या हप्त्याची मागणी करणे
* शासन अनुदान तीन टप्प्यात देणार येईल
* बँकेमध्ये स्वतंत्र खाते उघडणे अनिवार्य आहे
* शासन हिस्स्याप्रमाणे स्वहिस्सा जमा करणे
* निधी अन्य प्रकल्पासाठी वापरता येणार नाही
* त्रयस्थ तांत्रिक परिक्षणानंतर दुसरा हप्ता मिळणार
* स्वहिस्सा उभारणीस कर्ज घेण्यास मुभा आहे
---------
निविदेसाठी सात दिवस
प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ७ दिवसांच्या कालावधीत निविदा काढावी लागणार आहे. तीन महिन्याच्या कालावधीत कार्यादेश द्यावा लागणार आहे. तर ९१ व्या दिवसांपूर्वी प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करणे बंधनकारक केले आहे. प्रकल्पाची कार्यान्वीत यंत्रणा इचलकरंजी महापालिका असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com