पालकमंत्री साहेब पावणे चार कोटींच्या जलतरण तलावावर बोला

पालकमंत्री साहेब पावणे चार कोटींच्या जलतरण तलावावर बोला

Published on

फोटो जागा सोड २ कॉलम
पावणेचार कोटींच्या नुकसानीचा धनी कोण?
क्रीडाप्रेमींचा सवाल; विभागीय क्रीडा संकुलातील दुसऱ्या टप्प्यात कामांसाठी २६ कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ६ ः विभागीय क्रीडा संकुलात प्रस्तावित दुसऱ्या टप्प्यातील बांधकामसाठी २६ कोटी रुपये सरकारकडून आणले जाणार आहेत. यासंबधी पावसाळी अधिवेशनानंतर आणखी काय काय करता येईल, यावर संकुल सूचना समिती व क्रीडा उपसंचालकांसोबत बैठक पालकमंत्री भेट देऊन घेणार आहेत. मात्र, तत्पूर्वी याच संकुलात पावणेचार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या जलतरण तलाव व डायव्‍हिंग तलाव चुकीच्या ठिकाणी बांधल्याबद्दल जबाबदारी निश्‍चित करणार का? असा प्रश्न क्रीडा प्रेमींकडून विचारला जात आहे.
पाच जिल्ह्यांतील उदयोन्मुख खेळाडूंकरिता २००९ मध्ये संभाजीनगरात विभागीय क्रीडासंकुल बांधले. यात चारशे मीटरचा सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो मैदान, शूटींग रेंज, आंतरराष्ट्रीय दर्जाचे २५ बाय २५ चे जलतरण आणि डायव्हींग तलाव बांधले. यातील जलतरण, डायव्हींग तलाव सोडून सर्व मैदानाचा वापर होत आहे. मात्र, हे दोन्ही तलावांचे बांधकाम केल्यापासून यामध्ये संभाजीनगरकडून आलेल्या ड्रेनेज लाईनचे अशुद्ध पाणी मिसळते. त्यामुळे हे दोन्ही तलाव काहीच कामाचे राहिले नाहीत. यावर ३ कोटी ७२ लाख ६७ हजार खर्च झाले. पण तलाव काहीच उपयोगाचे नाहीत. यावर आयआयटीसह तज्ज्ञांनी काहीच होऊ शकत नाही, असे अहवालही क्रीडा विभागाला दिले आहेत. त्यामुळे इतका खर्च करून या जागेवर दोन्ही तलाव बांधले. त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. हा मुद्दा ऐरणीवर येण्याचे कारण म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी क्रीडा संकुलासाठी तत्कालीन सरकारने दुसऱ्या टप्प्यासाठी २६ कोटी मंजूर केले. या निधीसाठी प्रयत्नशील राहू, असे आश्‍वासन दिले. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर बैठक घेण्याचे आश्‍वासन दिल्याने हा प्रश्‍न ऐरणीवर आला.
जलतरण तलावाचा दुरुस्तीचाही प्रस्ताव
एका खासगी कंपनीने सीएसआर निधीतून जलतरण व डायव्हींग तलाव पोहण्यासाठी सज्ज करण्याचा प्रयत्न करू , अशी विचारणा विभागीय क्रीडा संकुल व क्रीडा उपसंचालक कार्यालयाकडे केली आहे.

-------
जलतरण तलावावर झालेला खर्च
-जलतरण तलाव- ७१ लाख ६९ हजार ५९६ रु.
- डायव्हींग तलाव- १ कोटी ५ लाख २३ हजार ३१५ रू.
- डायव्हींग डेस्क संरक्षक भिंत- ६३ लाख ३९ हजार १४९ रू.
- फिल्टर व प्रेक्षक गॅलरी- १ कोटी २० लाख ९४ हजार ११४ रू.
- डायव्हींग प्लॅटफॉर्म- ११ लाख ४१ हजार १०० रू
- एकूण ३ कोटी ७२ लाख ६७ हजार खर्च
----------
जलतरण तलावाऐवजी इनडोअर स्टेडियम शक्य
जलतरण तलाव व डायव्हींग तलाव बुजवून तेथे सरफेज करून डोम बांधून बॅडमिंटन हॉल, बास्केटबॉल व अन्य बहुउद्देशीय सभागृह उभे करता येईल. अन्य जागेवर जलतरण तलाव नव्याने बांधता येईल. यापूर्वीच्या जलतरण तलाव व डायव्हींग तलावाची जबाबदारी निश्‍चित, चौकशीचे काम करावे, अशी सूचना विभागीय क्रीडा संकुल निमंत्रित समिती सदस्य म्हणून मांडली आहे, अशी माहिती समिती सदस्य प्रा. अमर सासने यांनी दिली.

कोट
बहुउद्देशीय सभागृह, बाहेरील गाळे, बॅडमिंटन हॉल, खेळाडू निवास वसतिगृह बांधण्याबाबत प्रस्ताव दिला होता. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिवेशनानंतर संकुलास भेट देऊन तेथेच बैठक घेण्याचे आश्‍वासन नियोजन मंडळाच्या बैठकीत दिले. दुसऱ्या टप्प्यातील २६ कोटींचा निधी अपेक्षित आहे.
- माणिक पाटील, क्रीडा उपसंचालक

संकुलातील जलतरण तलाव, डायव्हींग तलावांची जागा चुकीची होती. तरीसुद्धा बांधकाम केले आहे. त्यामुळे वास्तूविशारद, ठेकेदार, संबधित तत्कालीन अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करावी.
- प्रकुल पाटील-मांगोरे, निमंत्रित सदस्य, विभागीय क्रीडासंकुल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.