अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीला २० वर्षे शिक्षा

Published on

फोटो ः 95202

अल्पवयीन मुलीवर अत्याचार;
एकास २० वर्षे कारावास

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः चौदावर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या आशिष अशोक जाधव (वय ३१, रा. वारे वसाहत, संभाजीनगर) याला न्यायालयाने दोषी ठरवून २० वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पीडित मुलीला नवीन वाशी नाका परिसरातील कोल्ड्रिंक हाऊसमध्ये नेऊन तिच्यासोबत ठेवलेल्या शारीरिक संबंधामुळे ती गर्भवती राहिल्याचे समोर आल्याने तिच्या आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली होती.
फेब्रुवारी २०१९ मध्ये आरोपीने वेळोवेळी या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. तिने ही बाब आईला सांगितल्यानंतर करवीर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांच्यासमोर झाली. अतिरिक्त सरकारी वकील एस. एस. रोटे यांनी मुख्य फिर्यादी, पीडित मुलगीची साक्ष, डी. एन. ए. रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट न्यायालयासमोर सादर केले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम ६ प्रमाणे दोषी ठरवून २० वर्षे सश्रम कारावास व २५ हजार रुपये दंडाची रक्कम पीडितेला देण्याची शिक्षा सुनावली. तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक सुनीता शेळके, सागर पोवार यांची सरकारी पक्षाला मदत मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.