जिल्ह्यातील १३ गावांना क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

जिल्ह्यातील १३ गावांना क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा

Published on

फोटो 95172, 95173

‘क’ वर्ग पर्यटनस्थळ दर्जा १३ गावांना
जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्णय; पंचगंगा प्रदूषणाचे प्रश्न मार्गी लावा : हसन मुश्रीफ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः जिल्ह्यातील ज्या देवस्थानांना वर्षाला १ लाखापेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतात अशा गावांना क वर्ग पर्यटनस्थळांचा दर्जा देण्यात आला. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय घेतला. तसेच आगामी आर्थिक वर्षातील निधी, विकासकामांचा आढावा याबाबतही नियोजन समितीच्या बैठकीत चर्चा झाली. सुरुवातीला दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि धैर्यशील माने यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘जिल्ह्यातील शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शाळांच्या इमारतींचे बांधकाम, येथील स्वच्छतागृहांचे बांधकाम करण्याबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करा, परीख पुलाखाली पावसाचे पाणी साचू नये यासाठी नूतनीकरणाची कार्यवाही जलद करा. पूरपरिस्थितीवर उपाय म्हणून बास्केट ब्रीज लवकर होणे आवश्यक आहे. रंकाळा आणि पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचे प्रश्नही मार्गी लावावेत.’ जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, ‘पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. नदीत गावांमधून मिसळणारे सांडपाणी थांबण्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका क्षेत्राच्या एसटीपी प्रकल्पास शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर अडीच वर्षांत हा प्रश्न मार्गी लागेल. बास्केट ब्रीजचे काम गतीने मार्गी लावण्यासाठी तसेच विभागीय क्रीडा संकुलाचे काम व जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संबंधित प्रलंबित विषय गतीने पूर्ण होण्यासाठी बैठक घेण्यात येईल.’
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार प्रकाश आबिटकर, आमदार जयश्री जाधव, प्रकाश आवाडे, राजूबाबा आवळे, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, समिती सदस्य, अधिकारी उपस्थित होते.
----
चार्ट करावा

निधीचा तपशील असा
मार्च २०२४ अखेर
मंजूर निधी- ५९८.६७ कोटी
खर्च निधी- ५९८.६० कोटी
-
२०२४-२ आर्थिक वर्षासाठी
मंजूर निधी - ५७६ कोटी
प्राप्त निधी- १९१.६५ कोटी

-------------------------
चौकट
तालुका*गाव (यात्रास्थळ)
हातकणंगले*रांगोळी (हजरत गैबी पीर दर्गा), भेंडवडे (श्री खंडोबा देवालय व गैबी पीर दर्गा)
पन्हाळा*माजगाव पैकी माळवाडी(श्री विठ्ठल-रुखमाई मंदिर), पिंपळे तर्फ ठाणे(श्री हनुमान मंदिर), पडळ (श्रीरामेश्वर मंदिर)
राधानगरी*कौलव (श्री मारुती देवालय), कुडुत्री(श्री कल्लेश्वर मंदिर), तरसंबळे(श्री जोतिर्लिंग मंदिर)
भुदरगड* आकुर्डे (श्री महादेव मंदिर)
करवीर* जैताळ (श्री हनुमान मंदिर)
आजरा*मडिलगे (श्री रामलिंग मंदिर देवालय)
गडहिंग्लज* क. नूल (श्री सुरगीश्वर मंदिर)
शाहूवाडी* पालेश्वर(पालेश्वर धरण परिसर)
--------------------------------
चौकट
कॉन्फरन्स हॉलचे उद्‌घाटन
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नवीन सभागृह (कॉन्फरन्स हॉल) बांधण्यात आले आहे. त्याचे उद्‌घाटन आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. असे दालन मुख्यमंत्र्यांकडेही नाही असे कौतुकाचे विधान त्यांनी या वेळी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.