गोरगरीबांना चांगले आरोग्य उपचार द्या - पालकमंत्री हसन मुश्रीफ

गोरगरीबांना चांगले आरोग्य उपचार द्या - पालकमंत्री हसन मुश्रीफ

Published on

95183
कोल्हापूर : महापालिकेतर्फे भोसलेवाडी येथील दत्तोबा शिंदे व्यायाम शाळेजवळ शनिवारी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्‍घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, सत्यजित कदम, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, प्रशासक के. मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

गोरगरिबांना चांगली आरोग्य सेवा द्या
पालकमंत्री मुश्रीफ : शहरात तीन नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : सरकारच्या १५ व्या वित्त आयोगातून उभारलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातून शहरातील गोरगरिबांना चांगल्या आरोग्य सेवा द्या, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केल्या.
महापालिकेतर्फे शहरातील भोसलेवाडी येथील दत्तोबा शिंदे व्यायाम शाळेजवळ आयोजित नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, माजी नगरसेवक सत्यजित कदम आदी उपस्थित होते.
दरम्यान, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक ९ सदर बाजारअंतर्गत भोसलेवाडी येथील दत्तोबा शिंदे व्यायाम शाळेशेजारी, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक १० सिध्दार्थनगरअंतर्गत अकबर मोहल्ला व प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र क्रमांक ११ मोरे-माने नगरअंतर्गत प्रथमेश मंदिर, सुर्वेनगर या ठिकाणी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजित घाटगे, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, उपशहर अभियंता रमेश कांबळे, वैभव माने यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, आशा स्वयंसेविका, नागरिक उपस्थित होते.
------------
या सुविध मिळणार
सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्था शहरी व ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत २८ आरोग्यवर्धिनी केंद्रे मंजूर झाली आहेत. या केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी यांच्यातर्फे आरोग्य तपासणी व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत. यासाठी एक वैद्यकीय अधिकारी, एक स्टाफ नर्स, एक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, एक अटेंडंट व स्वच्छता कर्मचारी, अशी पदे मंजूर आहेत. या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये प्राथमिक उपचार, गरोदर मातांची तपासणी, शून्य ते १६ वयोगटातील मुलांचे लसीकरण व आवश्यकतेनुसार तज्ज्ञ सेवा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.