जोतिबा प्राधिकरण आराखडा

जोतिबा प्राधिकरण आराखडा

Published on

जोतिबा विकास आराखड्यात
परिसरातील गावांचाही विकास साधा

पालकमंत्री ः जिल्‍हास्तरीय समितीची मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः श्री क्षेत्र जोतिबा डोंगर विकास आराखडा सादर करताना त्यामध्ये डोंगरावर येणारे भाविक व डोंगर परिसरातील रहिवाशांच्या सुविधांचा विचार करा. या परिसरातील तेवीस गावांमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊन रोजगार निर्मितीला चालना द्या, अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
श्री क्षेत्र जोतिबा डोंगर व परिसरातील गावांच्या विकास आराखड्याचे सादरीकरण आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘आराखडा यापूर्वी शासनाला सादर केला असून, त्याची रक्कम एक हजार पाचशे तीस कोटी रुपये इतकी होती. काही सुधारणांमुळे सुधारित आराखडा सध्या एक हजार ८१६ कोटींचा झाला आहे. वाढीव रकमेसह झालेल्या एक हजार ८१६ कोटी रुपयांच्या आराखड्यास आज जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली व हा आराखडा शासनाकडे फेरसादर करण्याचा निर्णय बैठकीत घेतला आहे.’
आराखड्यात डोंगर परिसरातील घनकचरा व्यवस्थापन व अन्य सर्व बाबींचा समावेश व्हावा. पर्यावरणूरक पद्धतीवर भर देऊन अधिकाधिक परिपूर्ण आराखडा तयार करा. डोंगराच्या आसपासच्या जंगल परिसराचा विचार करून प्राणिसंग्रहालय तयार करता येईल का, याचाही विचार व्हावा, अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी केल्या. जोतिबा डोंगरावरील नारळ व निर्माल्याचा पुनर्वापर करून बचत गटातील महिलांसाठी रोजगार निर्मिती होण्याबाबत विचार करा, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. आर्ट अँड स्पेस स्टुडिओचे आर्किटेक्ट संतोष रामाणे व अभिनंदन मगदूम यांनी आराखड्याचे सादरीकरण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.