उद्धव ठाकरे, पवार यांनी ऐकले नाही ः हसन मुश्रीफ

उद्धव ठाकरे, पवार यांनी ऐकले नाही ः हसन मुश्रीफ
Published on

शेकापच्या जयंत पाटलांबद्दल
ठाकरेंनी पवारांचे ऐकलेले नाही

मंत्री मुश्रीफ यांचा ‘महाविकास’ला टोला

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील एकाचा पराभव होईल. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना मदत करण्याबाबत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. मात्र, ठाकरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकलेले दिसत नाही. त्यामुळे त्यांनी उमेदवार दिला आहे,’ असा टोला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविकास आघाडीला लगावला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आलेल्या मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘विधान परिषदेची निवडणूक चुरशीची आहे. मात्र, यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील. शरद पवार यांनी जयंत पाटील यांना मदत करण्यास उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. मात्र त्यांनी त्यांचे ऐकलेले दिसत नाही, म्हणून त्यांनी शिवसेनेचा अतिरिक्त उमेदवार दिला आहे.’
आमदार विनय कोरे यांनी जनसुराज्य पक्षाला पाच जागा मागितल्या आहेत. यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘याचा निर्णय पक्षाचे प्रमुख घेतील. निवडून येण्याच्या क्षमतेनुसार जागा दिल्या जातात. नेतेमंडळींना कोरे यांच्या जागा निवडून येतील, असे वाटले तर ते त्यांना त्या प्रमाणात जागा सोडतील.’

चौकट
‘हिंदुत्ववाद्यांची समजूत काढेन’
‘विशाळगडावरील संबंधित जागा पुरातत्त्व विभागाच्या मालकीच्या आहेत. न्यायालयाची स्थगिती आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी लवकर सुनावणी घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी भेटल्यास त्यांची समजूत काढेन. ही बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे अधिकाऱ्यांचीही अडचण झाल्याचे हसन मुश्रीफ म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.