अधिवेशन- सतेज पाटील

अधिवेशन- सतेज पाटील

Published on

भटक्या जमातींच्या
विविध मागण्यांचा विचार व्हावा

सतेज पाटील यांची विधान परिषदेत मागणी

कोल्हापूर, ता. ६ ः राज्यातील नाथजोगी, नाथपंथी, डवरी, गोसावी, गोंधळी, वासुदेव, बागडी, चित्रकथी, मेंढरी या भटक्या जमातींच्या विविध मागण्यांबाबतचा तारांकित प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना सर्व जातींना आणि उपजातींना वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळाकडून विविध कर्ज योजनांचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी दिली.
राज्यातील भटक्या समाजाच्या विविध मागण्यांसाठी सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे एप्रिल महिन्यात निवेदन देण्यात आले असल्याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयांकडून असे कोणतेही निवेदन अद्याप शासनास प्राप्त झाले नसल्याचेही मंत्री सावे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.