शारीरिक शिक्षक होण्यासाठी अन्य जिल्ह्यांचा पर्याय

जिल्ह्यातील बी.पी.एड्., एम.पी.एड्. महाविद्यालये बंद ः उमेदवारांना आर्थिक भुर्दंड

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : शारीरिक शिक्षक होण्यासाठी बी.पी.एड्. व एम.पी.एड्. शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यातील अशी महाविद्यालयेच बंद झाल्याने शारीरिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांवर पुणे, बार्शी, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, जळगाव जिल्ह्यांत जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या निकषांनुसार शिवाजी विद्यापीठाकडून महाविद्यालय सुरू होईल, या आशेवर राहिलेल्या विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविल्यानंतर खेळाडूंचे शारीरिक शिक्षक होण्याचे स्वप्न असते. बी.पी.एड्. व एम. पी. एड्.चा अभ्यासक्रम पूर्ण करून पीएच.डी. करून तंत्रशुद्ध खेळाडू घडविण्याची मानसिकता वाढीस लागते. कोल्हापूर, कुरुंदवाड, तारदाळ येथील महाविद्यालयांना टाळे ठोकल्याने त्यांना अन्य जिल्ह्यांत जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ५० हजार रुपये खर्च करण्याची तयारी असूनही त्यांना कोल्हापुरात राहून तो पूर्ण करता येत नाही. अन्य जिल्ह्यांत जाऊन तो पूर्ण करायचा असल्यास खर्चाचे गणित बिघडते. वाडीपीर येथे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू होते. १६ हजार स्क्वेअर फूट जागा, चारशे मीटर ट्रॅक, आठ प्राध्यापक, २५ जणांचा स्टाफ, असे निकष नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने लागू केल्यानंतर हे महाविद्यालय बंद झाले. 
विद्यापीठ प्रशासनाला शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू करावे, यासाठी चार वर्षांपूर्वी निवृत्त प्राचार्य डॉ. डी. पी. डाफळे व त्यांच्या काही सहकारी प्राध्यापकांनी प्रस्ताव दिला होता. त्यामुळे खेळाडूंना आज ना उद्या त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असे वाटत होते. मात्र, अद्यापही त्यावर काहीच हालचाल झाली नसल्याने यंदा त्यांना अन्य जिल्ह्यांचे दरवाजे ठोठावावे लागत आहेत. कोल्हापूर क्रीडानगरी असताना तेथे शारीरिक शिक्षणशास्त्र विषयाचे महाविद्यालय नसल्याची खंत त्यांना आहे. 
....
कोट...
शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत. ते झाले तर खेळाडूंवरील आर्थिक ताण कमी होईल. जिल्ह्यात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेत्या खेळाडूंची कमतरता नाही. त्यांना करिअरसाठीचा मार्ग मोकळा होईल. 
- विजय रोकडे, शारीरिक शिक्षण संचालक, केआयटी
.....
चौकट
क्रीडा जाणकारांनी लक्ष द्यावे...
पुण्यातील चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व बार्शीतील शिवाजी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय अनुदानित आहे. अन्य महाविद्यालये विनाअनुदानित आहेत. महाविद्यालये विनाअनुदानित असूनही तेथे शुल्क भरून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची वेळ खेळाडूंवर आली आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या प्रशासनाला भेटून यातून काही मार्ग काढता येईल का, हे पाहणे गरजेचे आहे.
...............
शारिरिक शिक्षणसाठी महाविद्यालयांना निकष... 
- १६ हजार स्क्वेअर फूट जागा
- ४०० मीटर ट्रॅक
- आठ प्राध्यापक
- २५ जणांचा स्टाफ

शारीरिक शिक्षक होण्यासाठी अन्य जिल्ह्यांचा पर्याय जिल्ह्यातील बी.पी.एड्., एम.पी.एड्. महाविद्यालये बंद ः उमेदवारांना आर्थिक भुर्दंड संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. ७ : शारीरिक शिक्षक होण्यासाठी बी.पी.एड्. व एम.पी.एड्. शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यातील अशी महाविद्यालयेच बंद झाल्याने शारीरिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांवर पुणे, बार्शी, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, जळगाव जिल्ह्यांत जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या निकषांनुसार शिवाजी विद्यापीठाकडून महाविद्यालय सुरू होईल, या आशेवर राहिलेल्या विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविल्यानंतर खेळाडूंचे शारीरिक शिक्षक होण्याचे स्वप्न असते. बी.पी.एड्. व एम. पी. एड्.चा अभ्यासक्रम पूर्ण करून पीएच.डी. करून तंत्रशुद्ध खेळाडू घडविण्याची मानसिकता वाढीस लागते. कोल्हापूर, कुरुंदवाड, तारदाळ येथील महाविद्यालयांना टाळे ठोकल्याने त्यांना अन्य जिल्ह्यांत जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ५० हजार रुपये खर्च करण्याची तयारी असूनही त्यांना कोल्हापुरात राहून तो पूर्ण करता येत नाही. अन्य जिल्ह्यांत जाऊन तो पूर्ण करायचा असल्यास खर्चाचे गणित बिघडते. वाडीपीर येथे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू होते. १६ हजार स्क्वेअर फूट जागा, चारशे मीटर ट्रॅक, आठ प्राध्यापक, २५ जणांचा स्टाफ, असे निकष नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने लागू केल्यानंतर हे महाविद्यालय बंद झाले. विद्यापीठ प्रशासनाला शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू करावे, यासाठी चार वर्षांपूर्वी निवृत्त प्राचार्य डॉ. डी. पी. डाफळे व त्यांच्या काही सहकारी प्राध्यापकांनी प्रस्ताव दिला होता. त्यामुळे खेळाडूंना आज ना उद्या त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असे वाटत होते. मात्र, अद्यापही त्यावर काहीच हालचाल झाली नसल्याने यंदा त्यांना अन्य जिल्ह्यांचे दरवाजे ठोठावावे लागत आहेत. कोल्हापूर क्रीडानगरी असताना तेथे शारीरिक शिक्षणशास्त्र विषयाचे महाविद्यालय नसल्याची खंत त्यांना आहे. .... कोट... शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत. ते झाले तर खेळाडूंवरील आर्थिक ताण कमी होईल. जिल्ह्यात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेत्या खेळाडूंची कमतरता नाही. त्यांना करिअरसाठीचा मार्ग मोकळा होईल. - विजय रोकडे, शारीरिक शिक्षण संचालक, केआयटी ..... चौकट क्रीडा जाणकारांनी लक्ष द्यावे... पुण्यातील चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व बार्शीतील शिवाजी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय अनुदानित आहे. अन्य महाविद्यालये विनाअनुदानित आहेत. महाविद्यालये विनाअनुदानित असूनही तेथे शुल्क भरून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची वेळ खेळाडूंवर आली आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या प्रशासनाला भेटून यातून काही मार्ग काढता येईल का, हे पाहणे गरजेचे आहे. ............... शारिरिक शिक्षणसाठी महाविद्यालयांना निकष... - १६ हजार स्क्वेअर फूट जागा - ४०० मीटर ट्रॅक - आठ प्राध्यापक - २५ जणांचा स्टाफ

Published on

शारीरिक शिक्षक होण्यासाठी अन्य जिल्ह्यांचा पर्याय

जिल्ह्यातील बी.पी.एड्., एम.पी.एड्. महाविद्यालये बंद ः उमेदवारांना आर्थिक भुर्दंड

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : शारीरिक शिक्षक होण्यासाठी बी.पी.एड्. व एम.पी.एड्. शैक्षणिक पात्रता आवश्यक असते. मात्र, जिल्ह्यातील अशी महाविद्यालयेच बंद झाल्याने शारीरिक शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांवर पुणे, बार्शी, नांदेड, अमरावती, औरंगाबाद, जळगाव जिल्ह्यांत जाऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आर्थिक भार सहन करावा लागत आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या निकषांनुसार शिवाजी विद्यापीठाकडून महाविद्यालय सुरू होईल, या आशेवर राहिलेल्या विद्यार्थ्यांची अस्वस्थता वाढली आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळविल्यानंतर खेळाडूंचे शारीरिक शिक्षक होण्याचे स्वप्न असते. बी.पी.एड्. व एम. पी. एड्.चा अभ्यासक्रम पूर्ण करून पीएच.डी. करून तंत्रशुद्ध खेळाडू घडविण्याची मानसिकता वाढीस लागते. कोल्हापूर, कुरुंदवाड, तारदाळ येथील महाविद्यालयांना टाळे ठोकल्याने त्यांना अन्य जिल्ह्यांत जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी ५० हजार रुपये खर्च करण्याची तयारी असूनही त्यांना कोल्हापुरात राहून तो पूर्ण करता येत नाही. अन्य जिल्ह्यांत जाऊन तो पूर्ण करायचा असल्यास खर्चाचे गणित बिघडते. वाडीपीर येथे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू होते. १६ हजार स्क्वेअर फूट जागा, चारशे मीटर ट्रॅक, आठ प्राध्यापक, २५ जणांचा स्टाफ, असे निकष नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनने लागू केल्यानंतर हे महाविद्यालय बंद झाले.
विद्यापीठ प्रशासनाला शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय सुरू करावे, यासाठी चार वर्षांपूर्वी निवृत्त प्राचार्य डॉ. डी. पी. डाफळे व त्यांच्या काही सहकारी प्राध्यापकांनी प्रस्ताव दिला होता. त्यामुळे खेळाडूंना आज ना उद्या त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असे वाटत होते. मात्र, अद्यापही त्यावर काहीच हालचाल झाली नसल्याने यंदा त्यांना अन्य जिल्ह्यांचे दरवाजे ठोठावावे लागत आहेत. कोल्हापूर क्रीडानगरी असताना तेथे शारीरिक शिक्षणशास्त्र विषयाचे महाविद्यालय नसल्याची खंत त्यांना आहे.
....
कोट...
शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाची महाविद्यालये सुरू करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहेत. ते झाले तर खेळाडूंवरील आर्थिक ताण कमी होईल. जिल्ह्यात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेत्या खेळाडूंची कमतरता नाही. त्यांना करिअरसाठीचा मार्ग मोकळा होईल.
- विजय रोकडे, शारीरिक शिक्षण संचालक, केआयटी
.....
चौकट
क्रीडा जाणकारांनी लक्ष द्यावे...
पुण्यातील चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय व बार्शीतील शिवाजी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय अनुदानित आहे. अन्य महाविद्यालये विनाअनुदानित आहेत. महाविद्यालये विनाअनुदानित असूनही तेथे शुल्क भरून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची वेळ खेळाडूंवर आली आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्रातील जाणकारांनी नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनच्या प्रशासनाला भेटून यातून काही मार्ग काढता येईल का, हे पाहणे गरजेचे आहे.
...............
शारिरिक शिक्षणसाठी महाविद्यालयांना निकष...
- १६ हजार स्क्वेअर फूट जागा
- ४०० मीटर ट्रॅक
- आठ प्राध्यापक
- २५ जणांचा स्टाफ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.