‘महावितरण’कडून कोल्हापूर जिल्ह्यातील २६ हजार तक्रारी निकाली

‘महावितरण’कडून कोल्हापूर जिल्ह्यातील २६ हजार तक्रारी निकाली

‘महावितरण’कडून २६ हजार
ग्राहकांच्या तक्रारी निकाली

कोल्हापूर, ता. ६ : ‘महावितरण’कडून तीन महिन्यांत जिल्ह्यातील सुमारे २६ हजार ८०३ वीज ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन तक्रारीसाठी संकेतस्थळ, मोबाईल ॲप, टोल फ्री क्रमांक, ई-मेल, एसएमएस, ऊर्जा चॅटबॉट, मिस्ड कॉल सेवा अशा विविध माध्यमांतून तक्रारी आल्या होत्या.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी एप्रिल ते जूनदरम्यान तीन विविध पर्यायांद्वारे महावितरणकडे खंडित वीजपुरवठा, वीजदेयक व अन्य वीज सेवा-सुविधांबाबतच्या ३६ हजार ६०१ तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यातील ३६ हजार ५७४ तक्रारी निकाली काढल्या. तक्रारी निकालीचे हे प्रमाण ९९.९२ टक्के आहे, असा महावितरणचा दावा आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात ग्राहकांच्या खंडित वीज पुरवठ्याच्या १७ हजार ५७४, वीजदेयक विषयक ८३०४ व अन्य वीज सेवा-सुविधांबाबतच्या ९२५ अशा २६ हजार ८०३ दाखल तक्रारीपैकी २६ हजार ८०० तक्रारी निकाली काढल्या. सांगली जिल्ह्यात ग्राहकांच्या खंडित वीजपुरवठ्याच्या ४८२२, वीजदेयक विषयक ४५३५ व वीज सुविधेबाबतच्या ४४१, अशा ९ हजार ७९८ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यापैकी ९ हजार ७७४ तक्रारी निकाली काढल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com