मोबाईल टॉवर साहित्य चोरणाऱ्या चौघांना अटक

मोबाईल टॉवर साहित्य चोरणाऱ्या चौघांना अटक

Published on

95262 बाळासाहेब कांबळे
95263 बळीराम उपाडे
95264 प्रशांत जोगदंड
95265 शिवाजी वासुदेव

मोबाईल टॉवर साहित्य
चोरणाऱ्या चौघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ ः गगनबावडा तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवरचे साहित्य चोरून विकणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. बाळासाहेब सिद्राम कांबळे (वय ३२, आर्वी, लातूर), बळीराम रंगनाथ उपाडे (वय २०, इटी, लातूर), प्रशांत दिलीप जोगदंड (वय २५, वाघाला, अंबेजोगाई) व शिवाजी राजू वासुदेव (३६, राधानगरी) अशी संशयितांची नावे आहेत. त्याच्याकडून ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
संशयित बाळासाहेब कांबळे व बळीराम उपाडे या दोघांनी जरगी (ता. गगनबावडा) येथे उभारण्यात येणाऱ्या नवीन मोबाईल टॉवरचे साहित्य चोरले होते. तसेच हे साहित्य राधानगरीतील शिवाजी वासुदेव याला विकल्याची माहिती अंमलदार अमोल कोळेकर यांना मिळाली होती. त्यांनी याची माहिती पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना दिल्यानंतर त्यांनी उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाला संशयितांना पकडण्याची कामगिरी दिली होती. संशयित कांबळे व उपाडे कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरानजीक परीख पुलाजवळ येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. या परिसरात सापळा रचून दोघांना पकडले. चौकशीदरम्यान त्यांनी आणखी एका साथीदाराच्या मदतीने मोबाईल टॉवरचे साहित्य चोरल्याची कबुली दिली. याप्रकरणी तिघा चोरट्यांसह साहित्य विकत घेणाऱ्यालाही अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.