अंबाबाई मंदिर

अंबाबाई मंदिर

Published on

95485
...
भाविकांची पावसातच दर्शनरांगेत प्रतीक्षा
पावसाचा जोर वाढल्याने गैरसोय ः अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शन रांगेत भाविकांना पावसात उभे राहून प्रतीक्षा करावी लागली. गेल्या दोन दिवसांत पावसाचा जोर वाढल्यानंतर भाविकांची गैरसोय झाली. ही गैरसोय दूर करण्यासाठी देवस्थान समितीकडून साधारण दोनशे मीटर परिसरात छत उभे केले जाणार आहे. यापूर्वी तेथे उन्हापासून बचावासाठी कापडी मांडव घातला होता. मात्र, उन्हाळा संपल्यानंतर तो काढण्यात आला. त्यातच दर्शनरांगेचे नियोजन चुकल्याने भाविकांना भर पावसात उभे राहावे लागले.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी - रविवारी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. आजही मोठ्या संख्येने भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. मात्र, पूर्वेकडून आत मंदिर आवारात गेल्यानंतर दोनशे मीटरच्या परिसरात छत नसल्याने भाविकांना भिजतच उभे राहावे लागले. अनेकांनी छत्रीचा आधार घेतला. तर अनेकांच्या बॅगा बाहेर ठेवल्यामुळे छत्री नसल्याने पावसातच दर्शनरांगेत प्रतीक्षा करावी लागली.
...

‘दरवर्षी पावसाळ्यात दर्शनरांगेचे नियोजन केले जाते. दर्शनरांगेसाठी पत्र्याचे शेड उभे केले आहे. मात्र, अगदी थोड्या परिसरात छत घालण्याचे लक्षात आले नाही. यामुळे गैरसोय झाली असली तरी त्वरित येथे पत्र्याचे छत देवस्थान समितीतर्फे घालण्यात येईल.
- महादेव दिंडे, व्यवस्थापक, देवस्थान समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.