कॉ. संपत देसाई यांचे पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

कॉ. संपत देसाई यांचे पुस्तक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

कॉ. संपत देसाई यांचे पुस्तक
विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ७ ः श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांचे ‘एका लोकलढ्याची यशोगाथा’ हे पुस्तक शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. कला शाखेतील मराठी विभागाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक राहणार आहे. या पुस्तकामुळे आजरा परिसरात लढल्या गेलेल्या कष्टकऱ्यांचा लढा विद्यापीठीय पातळीवर अभ्यासला जाणार आहे. त्यामुळे तालुक्याचा सामाजिक, सांस्कृतिक व चळवळीच्या इतिहासाला उजाळा मिळणार आहे.
सर्वार्थाने फाटकी असलेली माणसं नैतिकता आणि आत्मविश्वासाच्या बळावर शासन, प्रशासनासारख्या बलाढ्य व्यवस्थेला कशी नामोहरण करू शकतात, आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संविधानाच्या चौकटीत राहून सूत्रबद्ध आणि रचनात्मक संघर्ष कसा उभा करू शकतात याचे दर्शन या पुस्तकातून घडते. आपली बाजू न्याय असेल तर अशावेळी परस्पर विश्वासाने आणि लोकशाही मार्गाने लढा कसा उभारावा आणि तो कसा यशस्वी करावा याचे शास्त्र या पुस्तकात लेखक कॉ. देसाई यांनी उलगडून सांगितले आहे.
पुस्तकात जसे लढ्याबद्दलचे वास्तव आहे, तसेच या परिसराच्या स्थानिक संस्कृतीबद्दलही हे पुस्तक तितक्याच आत्मीयतेने बोलते. आजरा परिसरातील रूढी, परंपरा, प्रथा इथलं समाजजीवनही आले आहे. अनेक व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह परिसरातील जशी माणसं भेटतात तसा इथला निसर्गही भेटतो. इथल्या माणसांचं निसर्गाशी असलेलं अतूट नातं, या माणसांचं अभावग्रस्त जगणं याबद्दलची आस्था या लेखनात पाझरत राहते. तीच आस्था तोच कळवळा संपूर्ण पुस्तकभर पसरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com