खंडपीठ कृती समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार

खंडपीठ कृती समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेणार

खंडपीठ कृती समितीची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून द्या
पालकमंत्र्यांसोबत चर्चा : उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे पाठपुराव्यासाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्‍या मुख्य न्यायाधीशांचा अहवाल महत्त्वपूर्ण आहे. सर्किट बेंचसाठी जागा खरेदी करण्यासाठी तरतूद केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य न्यायाधीशांची भेट घेतल्यास हा प्रश्न लवकर मार्गी लागण्यास मदत होईल, यासाठी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा खंडपीठ कृती समितीने घेतल्याची भूमिका खंडपीठ कृती समितीने रविवारी पालकमंत्री हसन मुश्रीफांसमोर मांडली. मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घडवून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी कृती समितीला दिले.
सर्किट बेंच स्थापनेसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूरमधील काही तालुक्यांचा खंडपीठ कृती समितीच्या नेतृत्त्वाखाली संघर्ष सुरू आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनाची फलश्रृती म्हणून तत्त्‍कालीन न्यायमूर्ती मोहित शहा यांनी कोल्हापुरातच सर्किट बेंच स्थापन व्हावे, असा सकारात्मक अहवाल दिला होता. या अहवालाबाबत मुख्य न्यायमूर्तींनी निर्णय घेणे गरजेचे आहे. कृती समितीने याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्च न्यायाधीशांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. पण, ही भेट वेगवेगळ्या कारणांनी रखडली आहे, असे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सर्जेराव खोत यांनी सांगितले.
रविवारी खंडपीठ कृती समितीने शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री मुश्रीफांची भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घडवून द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली. यावर आठवडाभरात ही भेट घडवून आणण्याचे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. तसेच कोल्हापूरबाबत यापूर्वी दिलेल्या सकारात्मक अहवालांची माहिती मुख्यमंत्र्यांसमोर सादर करू, असेही त्यांनी सांगितले.
सर्किट बेंचच्या मागणीसाठी सर्व वकिलांनी मतभेद विसरून एकत्रित यावे, असे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीने केले. भविष्यात लोकप्रतिनिधींवर दबाव वाढवून त्यांनाही या आंदोलनात सहभागी करून घेण्याची सूचना कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.
बैठकीला ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. महादेवराव आडगुळे, ॲड. शिवाजीराव राणे, सर्वपक्षीय कृती समितीचे आर. के. पोवार, ॲड. बाबा इंदूलकर, ॲड. रणजित गावडे, कॉ. दिलीप पवार, चंद्रकांत यादव, सुनील मोदी, सुभाष देसाई, संदीप देसाई, अनिल घाटगे, अशोक भंडारे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com