भटके विमुक्त विकास परिषद कार्यक्रम

भटके विमुक्त विकास परिषद कार्यक्रम

Published on

(फोटो - ९५५१०)
...

विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या संधी शोधाव्यात
हरिश धार्मिक ः भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे करिअर मार्गदर्शन मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.७ः ‘सरकारी नोकरी मिळवण्यासाठी फार मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. खासगी नोकरी मिळवणेदेखील आव्हानात्मक आहे. अशावेळी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी व्यवसायाच्या नव्या संधी शोधल्या पाहिजेत. व्यवसाय हादेखील करिअर करण्याचा चांगला मार्ग आहे,’ असा सल्ला करवीरचे प्रांताधिकारी हरिश धार्मिक यांनी विद्यार्थ्यांना दिला. भटके विमुक्त विकास परिषदेतर्फे विद्यार्थ्यांनसाठी करिअर व कौशल्य विकास मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. यामध्ये ते बोलत होते. शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिरात हा कार्यक्रम झाला.
भटके विमुक्त विकास परिषदेचे प्रमुख अशोक लाखे यांनी प्रा. प्रसन्न करमरकर व हरिश धार्मिक यांचे स्वागत केले. ‘विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना कौशल्य विकासाचा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. तसेच पदवी अभ्यासक्रम शिकताना त्यातील करिअरच्या संधीदेखील लक्षात घेतल्या पाहिजेत,’ असे मार्गदर्शन प्रा. करमरकर यांनी केले.
प्रांताधिकारी धार्मिक म्हणाले, ‘शासकीय नोकरी मिळवण्यासाठी आर्थिक आणि मानसिक स्थिती चांगली असावी लागते. दररोज १६ तास अभ्यास करावा लागतो. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये खूप मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागते. खासगी नोकरी मिळवणेदेखील सध्या आव्हानात्मक आहे. अशा काळात विद्यार्थ्यांनी व्यावसायिक संधी शोधणे आवश्यक आहे. शिक्षण घेत असतानाच कोणत्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या संधी आहेत, त्यासाठी कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. भांडवल कसे उभे करता येईल, या गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. सचोटीने चांगला व्यवसाय करणे हादेखील करिअरचा उत्तम मार्ग आहे.’ स्वप्नील निपाणीकर यांनी सूत्रसंचालन केले. या मेळाव्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.