पंचगंगेवरील जुना पूल धोकादायक

पंचगंगेवरील जुना पूल धोकादायक

Published on

ich710-F.jpg
95528
इचलकरंजी : जुना पुलावरील संरक्षण कठड्याची दुरवस्था झाली आहे.

पंचगंगेवरील जुना पूल धोकादायक
अनेक ठिकाणी संरक्षण पाईप निखळल्या : गणेशोत्सवापूर्वी दुरुस्ती आवश्‍यक
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ७ : इचलकरंजी-माणकापूर, हुपरी, यळगूड यांसह अन्य गावांना जोडणाऱ्या जुना पुलावर जागोजागी खड्डे पडले आहेत. तर संरक्षण पाईप अनेक ठिकाणची निघून पडली असल्याने पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पुलावर पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्याने रात्री स्थिती आणखी खराब होत आहे. गणेश उत्सव ही जवळ आल्याने पुलाची दुरुस्ती अत्यावश्यक बनली आहे. सध्या मात्र दुर्घटना टाळण्यासाठी पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना खबरदारी घ्यावी लागत आहे.
शहराला ग्रामीण भागास जोडणाऱ्या पंचगंगा नदीवरील जुन्या पुलाची अवस्था काही वर्षापासून दयनीय बनली आहे. पुलावरून वाहतूक करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसवलेल्या लोखंडी संरक्षण पाईप निघून पडल्या आहेत. या पाईपला आधार असलेले सिमेंट खांबही उखडून पडले आहेत. त्यातच प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्याखाली पूल जात असल्याने स्थिती खराब होत आहे. पुलाचे बांधकाम १९६५ ते ६७ दरम्यान केले आहे. सुमारे साठ वर्षांचा कालावधी पूर्ण होत असून ऊन, वारा, महापूर याचा मारा सहन करत पूल उभा आहे. आजही पुलाचे बांधकाम भक्कम आहे. मात्र काही ठिकाणी पुलास डागडुजीची आवश्यकता भासत आहे. ती वेळेवर केल्यास आणखी काही वर्षे हा पूल वापरता येणार आहे.
इचलकरंजी सांगाव, कागल या मार्गावरील गावांना जाणारी वाहतूक जुन्या पुलाचा वापर करते. तसेच तेथून इचलकरंजी शहरात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. परिणामी जुना पुलावर वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. पुलाची रुंदी जेमतेम असून येथून दोन्ही मार्गाने वाहतूक सुरू असते. त्यातच खड्डे पडल्याने अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा न करता पुलाची दुरुस्ती गरजेची बनली आहे.
-------------------
वाहनधारकांचा जीव धोक्यात
माणकापूर येथे जाताना पूल संपल्यावर असणाऱ्या वळणावर कोणत्याही प्रकारचा संरक्षण कठडा नसल्याने हे वळण अत्यंत धोकादायक बनले आहे. अशा स्थितीत सध्या या पुलावरून वाहतूक सुरू आहे. पुलाची दुरुस्तीची करण्याची गरज असताना प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असल्याने वाहनधारकांचा जीव धोक्यात आल्याचे दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.