पहिलीतील १८०० विद्यार्थ्यांना मिळाले नवे दप्तर

पहिलीतील १८०० विद्यार्थ्यांना मिळाले नवे दप्तर

Published on

95530
...

पहिलीतील १८०० विद्यार्थ्यांना मिळाले नवे दप्तर

महापालिका शिक्षक पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम-प्रलंबित प्रश्न सोडविण्याची उपायुक्तांकडून ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः महानगरपालिकेच्या शाळेमधील इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेशित झालेल्या १८०० विद्यार्थ्यांना नवे दप्तर (स्कूल बॅग) मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. दरवर्षीप्रमाणे कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमात महानगरपालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी सभापती भारती सूर्यवंशी होत्या. ‘पतसंस्थेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. शिक्षण समितीकडील शिक्षक- कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येतील. प्रशासन व शिक्षक मिळून महापालिकेच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच विविध सोयी सुविधा पुरवण्यासाठी एकत्रितपणे काम करूया’, असे आवाहन उपायुक्त पाटील यांनी केले.
चिटणीस सुधाकर सावंत यांनी पतसंस्थेतर्फे चालवलेल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिक्षण समितीकडील शिक्षक विविध उपक्रम राबवून चांगल्या प्रकारे शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि पट टिकवण्याकरिता कशाप्रकारे काम करत आहेत याचीही त्यांनी माहिती दिली. तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची विनंती केली. या कार्यक्रमास उद्योगपती राहुल माने, पतसंस्थेचे खजानीस लक्ष्मण पवार, अनुराधा शिंत्रे, संचालक संजय पाटील, कुलदीप जठार, वसंत आडके, उमर जमादार, प्रदीप पाटील, विजय माळी, विलास पिंगळे, मनोहर सरगर, राजेंद्र गेजगे, नेताजी फराकटे, विजय सुतार, प्रभाकर लोखंडे, शकील भेंडवडे, प्रकाश पाटील, फारुख डबीर उपस्थित होते. उपसभापती मनीषा पांचाळ यांनी प्रास्‍ताविक केले. विनोदकुमार भोंग यांनी सूत्रसंचालन केले. कुलदीप जठार यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.