डॉक्टर्स डे

डॉक्टर्स डे

फोटो 95498

विदेशात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनी देशासाठी काम करावे
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज : कोल्हापूर मेडिकल असोसिएसनतर्फे ''आम्ही शतायु'' ग्रंथाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : देशाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम डॉक्टर्स करतात; परंतु देशाबाहेर जाऊन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांनी देशासाठी काम करावे, अशी अपेक्षा खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली. ‘डॉक्टर्स डे’ निमित्त कोल्हापूर मेडिकल असोसिएसनतर्फे ‘आम्ही शतायु’ ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी ते बोलत होते.
खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘डॉक्टर रुग्णांसाठी आशेचा किरण असतात; परंतु या आशेच्या किरणाला दोषी ठरवले जाते. म्हणूनच मागील वर्षी लोकसभेत देशातील डॉक्टरांना बळ देणारा कायदा करण्यात आला.’ पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी डॉक्टर झाल्यानंतर त्यांची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढली होती. आता आम्ही दोन्ही खासदार मिळून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचा रथ पुढे नेण्याची सांघिक जबाबदारी घेऊ.’
ग्रंथाचे संपादक डॉ. अमर अडके म्हणाले, ‘आम्ही शतायु’ केवळ ग्रंथ नसून, शंभर वर्षांतील वैद्यकीय विश्वातील क्रांती आणि इतिहास आहे. भविष्यात हा ग्रंथ खंडरूपात प्रकाशित करण्याचा मानस आहे.’
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर म्हणाले, ‘वैद्यकीय क्षेत्रातील शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने आजवर अनेक जनजागृती कार्यक्रम केले आहेत. या ग्रंथामुळे मेडिकल असोसिएशनचा आणि वैद्यकीय क्षेत्राचा इतिहास वाचकांसमोर येईल.’
असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. किरण दोशी, उपाध्यक्ष डॉ. ए. बी. पाटील, डॉ. आर. एम. कुलकर्णी, डॉ. सूरज पवार, सल्लागार समितीच्‍या अध्यक्षा डॉ. आशा जाधव, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. रवींद्र शिंदे, सदस्य डॉ. गीता पिल्लाई, डॉ. उन्नती सबनीस, आदी उपस्थित होते. डॉ. मंजिरी वायचळ, डॉ. संतोष कुलकर्णी, डॉ. संयुक्ता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट
मधुर सुरांच्या रुपेरी धारा
देशातील प्रसिद्ध चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. बिधानचंद्र रॉय यांची जयंती व स्मृती दिनानिमित्त एक जुलैला ''डॉक्टर्स डे'' साजरा होतो. यानिमित्त असोसिएशनतर्फे ''मधुर सुरांच्या रूपेरी धारा'' संगीत कार्यक्रम झाला. असोसिएशनच्या डॉक्टर्सनी मराठी गीते सादर केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com