जोड… हवा करवीरची

जोड… हवा करवीरची

Published on

जोड… हवा करवीरची…

(नेत्याचा फोटो)
...

योजना निवडणुकीसाठीच हाय की...!

काही नेत्यांना कार्यकर्तेवजा आंदोलकांच्या प्रश्नावर उत्तर काय द्यायचे, याबाबत संभ्रमावस्था असते. त्यावेळी नेत्यांनी दिलेले उत्तर हे मिश्कील असते. कार्यकर्ते ते उत्तर हसण्यावर घालवतात, कारण नेत्यांशी असणारी सलगी हेच त्यांना असे वागण्यास भाग पाडते. शहराच्या प्रश्‍नांवर काम करणाऱ्या एका कृती समितीची अशीच अवस्था झाली. या कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या नेत्याची भेट घेतली. निवेदनही सादर केले. पण, गंभीर प्रश्नावर चर्चा करताना वातावरणही गंभीर हवे. पण, तसे वातावरण ठेवले तर (पूर्वाश्रमीचे आता विरोधातील) नेते दुखावतील. पुन्हा आपल्या राजकीय वाटचालीत अडचणीची भर नको, अशा भावना ठेवत शिष्टमंडळातील आंदोलकांनी नेत्यांना जाब ( प्रेमाने) विचारला. ‘लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच नाही ना’, त्यावर तितक्याच ‘गांभीर्याने’ (स्मित हास्य) दबक्या आवाजात ‘होय, ही योजना निवडणुकीसाठीच हाय की’ असे उत्तर नेत्यांनी मिश्कीलपणे देऊन स्वत:ची सोडवणूक करून घेतली. नेत्यानांही दुखवू नये म्हणून कार्यकर्तेही हास्यात बुडाले व एक गंभीर प्रश्न हास्यात विलीन झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.