निसर्गमित्र कार्यशाळा

निसर्गमित्र कार्यशाळा

Published on

95718
...

निसर्गमित्र तर्फे शिक्षकांसाठी
बीजारोपण कार्यशाळा
कोल्हापूर, ता. ८ : आंतरराष्ट्रीय दुधाळ जनावरे संवर्धन वर्षानिमित्त दलितमित्र बापूसाहेब पाटील ग्रंथालय संचलित निसर्गमित्र परिवार व करवीर पंचायत समिती शिक्षणविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षकांसाठी बीजारोपण कार्यशाळा नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील होते. निसर्गमित्र परिवाराचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी मार्गदर्शन केले.
त्यांनी बिया संकलन व बीजारोपण या विषयी माहिती देताना गाव व शाळेच्या परिसरातील नैसर्गिकरित्या उगवलेली रोपे संकलन करणे, रोपवाटिका तयार करणे, कुंडी शास्त्रीय पद्धतीने भरणे व वृक्षपेढ्या तयार करणे, दुधाळ जनावरांच्या चारा टंचाईवर मात करण्यासाठी चारा वृक्षाची लागवड वाढवणे, पाळीव जनावरांच्या आजारावरील उपचारासाठी हर्बल गार्डन तयार करणे, रंग देणारे वृक्ष, आजीबाईच्या बटव्यातील वनस्पती, सण व उत्सवासाठी लागणारी वनस्पती, देशी बियाणापासून भाजीपाला लागवड करणे याची माहिती दिली.
दरम्यान, प्रत्येक शाळेला वृक्षरोपवाटिका, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या विषयाची पुस्तके, हादगा, लसूण गवत व मका या चारा वनस्पतींची बियाणे भेट म्हणून अधीक्षक आर. ए. शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. विजय ओतारी यांनी प्रास्ताविक केले. अर्चना पाथरे यांनी आभार मानले. यावेळी अनंत कुलकर्णी, संदीप पाटील, योगेश खराडे, यश चौगुले, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.