शक्तीपीठ महामार्गाला विरोध

शक्तीपीठ महामार्गाला विरोध

फोटो-95760

शक्‍तिपीठ, स्मार्ट मीटर विरोधात
श्रमिक शेतकरी संघटनेची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : निव्वळ कंत्राटदारांना फायदा व्हावा या हेतूने शक्‍तिपीठ महामार्ग आणि स्मार्ट मीटर योजना आणली आहे. या योजनांचा लाभ काही मूठभर लोकांना मिळणार असून, सामान्य शेतकरी, नागरिक यांचा यामध्ये आर्थिक तोटा आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांना श्रमिक शेतकरी संघटनेचा विरोध आहे, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेने घेतली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनातील माहितीनुसार, कोणाचीही मागणी नसताना शक्‍तिपीठ महामार्गाचा आराखडा बनवला आहे. यासाठी २५ हजार ५०० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. यामध्ये जंगल, विहिरी, कालवे, डोंगर हे सर्व भुईसपाट केले जाईल. यामध्ये केवेळ भांडवलदारांचा फायदा होणार आहे. अशीच दुसरी योजना स्मार्ट मीटरची आहे. यामध्ये घरातील चांगले वीज मीटर बदलून महागडे स्मार्ट मीटर घेण्यास नागरिकांना भाग पाडले जात आहे. केवळ काही कार्पोरेट कंपन्यांना फायदा व्हावा म्हणून ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे या दोन्ही योजनांना विरोध असून, त्या बंद केल्या पाहिजेत. श्रमिक नेते अतुल दिघे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com